टीम मंगळवेढा टाईम्स ।
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिल आणि 17 महिन्यापासून तटलेले पगार देण्याची मागणी कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी पुन्हा एकदा केलीय.
कोरोनाच्या काळात अनेक ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, ऊस वाहतूकदार यांना कोरोना रोगाची लागण झाली आहे. तर काहीजण उपचार घेत आहेत. त्यांना पैशाची प्रचंड गरज आहे.
गेली 5 महिने झाले कारखान्याला ऊस घालवलेल्या शेतकऱ्यांची बिले द्यावीत अशी मागणी करण्याचे संचालक युवराजदादा पाटील यांनी विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांच्याकडे केलीय.
विधानसभा निवडणुकी पूर्वी युवराजदादा पाटील यांनी विठ्ठल ची निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून विठ्ठल परिवारात कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील गट आणि भालके यांचा गट समोरासमोर आले आहेत.
विठ्ठलच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिल मिळवी म्ह्णून युवराजदादांनी साखर आयुक्तांना पत्र लिहून RRC ची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कारखान्यावर RRC ची कारवाई देखील झाली होती.
शेतकऱ्यांची बिल न दिल्यामुळेच चेअरमन भगीरथ भालके यांचा विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्याचे बोलले जात आहे.
त्यातच युवराजदादा पाटील यांनी शेतकरी आणि कामगारांची देणी देण्याची मागणी केल्यामुळे चेअरमन भगीरथ भालके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज