मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
भारतात 5G नेटवर्कनंतर आता भारत सरकार 6G नेटवर्क आणण्याच्या तयारीत आहे. देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काल लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की, देशात 6G नेटवर्क आणण्याची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी कर्मचारी वर्गही तयार करण्यात आला आहे.
77 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी 5G नेटवर्कच्या प्रसाराचे देखीस कौतुक केले. देश आता क्वांटम कॉम्प्युटरसाठी सज्ज होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी म्हणाले की, इंटरनेटचं जाळं आता प्रत्येक गावात पोहोचत आहे आणि देश आता क्वांटम कॉम्प्युटरसाठीही तयार होत आहे. पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भारत हा 5G टेक्नॉलॉजीच्या सर्वात वेगाने वाढणारा देश आहे.
आज ही टेक्नॉलॉजी 700 हून अधिक जिल्ह्यांपर्यंत पोहोचली आहे असा अंदाज लावण्यात येतोय. डिजिटल इंडियाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, विकसित देश देखील डिजिटल इंडियाच्या यशाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान प्रगत करण्याची योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या या विशेष प्रसंगी सांगितले की, भारत सरकार कृषी क्षेत्रात टेक्नॉलॉजी प्रगत करण्यासाठी एका नवीन योजनेवर काम करत आहे. या योजनेच्या माध्यमातून हजारो बचत गटातील महिलांना ड्रोन दिले जातील आणि ते कसं हाताळायचं याचं प्रशिक्षणही त्यांना दिलं जाईल. पीटीआयच्या वृत्तानुसार,
पंतप्रधान मोदी म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची क्षमता आमच्या ग्रामीण महिलांमध्ये मला दिसतेय. त्यामुळे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणण्यासाठी आम्ही नवीन योजनेचा विचार करत आहोत.
भ्रष्टाचारावर मात करण्यासाठीही सरकार तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की 2014 पूर्वी इंटरनेट सेवा खूप महाग होती, परंतु सध्या त्याची किंमत सर्वात कमी आहे. यामुळे ही सेवा आता सर्वांना परवडणारी झाली आहे.
6G, नावाप्रमाणेच, 5G नंतरची पुढील पायरी आहे, जरी ती अद्याप वास्तविक नसली तरी. असे म्हटले जाते की 6G च्या आगमनाने, इंटरनेट आधीच अस्तित्वात असलेल्या सुपर-फास्ट 5G पेक्षा 100 पट वेगवान होईल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज