mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अभिमानास्पद! अवघ्या 12 वर्षात 900 कोटींकडे वाटचाल असलेली सोलापूर जिल्ह्यात एकमेव बँक धनश्री मल्टिस्टेट; ग्राहकांच्या अतूट विश्वासावरच धनश्री बँकेची प्रगती व नावलौकीकता वाढली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 24, 2023
in मंगळवेढा, सोलापूर
धनश्री मल्टिस्टेट बँकेचे अकराव्या वर्षात दमदार पदार्पण; सर्वोत्कृष्ट सेवेतून यशस्वी वाटचाल!

टीम मंगळवेढा टाईम्स। 

काही अर्थ वाढवावा ! संसार सुखे करावा !! हे ब्रीदवाक्य घेऊन विश्वसनीय व्यवहारांद्वारे अनेक कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्या धनश्री मल्टिस्टेट को- ऑप. सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेची १२ वर्षांपूर्वी स्थापना झाली. या संस्थेचा विश्वासाचे आणि प्रगतीचे एक तप सोहळा साजरा करत आहोत.

समाजातील प्रत्येकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली. ‘छोट्या लोकांची मोठी बँक’ म्हणून गेल्या  दशकांपासून सहकार क्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केलेली बँक म्हणून आज धनश्री मल्टिस्टेट को- ऑप. सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेची जनमानसात ओळख आहे.

धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे व त्यांचे सहकारी संचालक मंडळ यांनी या अगोदर धनश्री महिला पतसंस्थेची स्थापना केली. परंतु पतसंस्थेच्या शाखा विस्तारास निर्बंध आल्याने सन २०११ साली धनश्री मल्टिस्टेट को- ऑप. सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेची स्थापना केली.

संस्थेचे चेअरमन म्हणून प्रा.शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभाताई काळुंगे तसेच त्यांचे सर्व संचालक मंडळ यांनी सर्वसामान्य माणसांची आर्थिक उन्नती व पारदर्शक कारभार हा सहकारासाठी जो गुरुमंत्र दिला आहे, तो जोपासून खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू ठेवली आहे.

धनश्री मल्टिस्टेटचे ग्राहकांशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध

आतापर्यंत सर्व सभासद व ग्राहक यांच्याशी धनश्री मल्टिस्टेट ने आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध जोपासले आहेत,

आधुनिक सेवासुविधांव्दारे असंख्य कुटुंबांशी आपुलकीचे नातं

आधुनिक सेवासुविधांव्दारे असंख्य कुटुंबांशी आपुलकीचे नातं जोडणारी संस्था म्हणून धनश्री मल्टिस्टेट जनमानसात ओळखली जाते. बँकेच्या सभासद, ठेवीदार, हितचिंतक व ग्राहकांनी आजपर्यंत बँकेवर केलेल्या प्रेमामुळे बँकेने विविध आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

धनश्री मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दैनंदिन व्यवहारात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सहकारात बदल घडवणारी संस्था म्हणून धनश्री मल्टिस्टेटकडे पाहिले जाते.

गरजूंना मदतीचा हात देण्यात धनश्रीचा पुढाकार

सामाजिक कार्यात संस्थेचा नेहमी पुढाकार असतो. विविध उपक्रमांमधून संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविणे असो की गरजूंना मदतीचा हात देणे असो, यामध्ये संस्थेचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून गौरव

संस्थेच्या एकूणच कार्याची दखल घेऊन फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को- ओपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पुणे मार्फत ५०१ ते १००० ठेवी असलेल्या संस्था गटातून धनश्री मल्टीस्टेट सोसायटीला सहकार गौरव पुरस्कार देऊन महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून गौरवण्यात आले आहे.

मुख्य कार्यालयासह ३४ शाखांद्वारे बँकिंग सेवा

सहकार क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भविष्यात देखील बँकेची वाटचाल अशाच पद्धतीने होत राहील. मुख्य कार्यालयासह ३४ शाखांद्वारे ही बँकिंग क्षेत्रातील सेवा दिली जात आहे. एकीकडे सहकार क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाल्याने अनेकांची अवस्था बिकट झालेली पहावयास मिळते आहे.

सरव्यवस्थापक रमेश फडतरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली १५० हुन अधिक कर्मचारी कार्यरत

संस्था ही काटकसरीने व तितक्याच कटाक्षाने चालवली तरच संस्थेचे भवितव्य टिकून राहील. हेच धर्य मनात ठेवून चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे व संचालक मंडळानी वाटचाल सुरू ठेवली आहे.  संस्थेचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यालयासह ३४ शाखांमध्ये जवळपास १५० हुन अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

संस्थेत येणारा प्रत्येक ग्राहक हा आपल्यासाठी देव आहे असे समजून त्यांना चांगली सेवा देण्याचे काम इथला प्रत्येक कर्मचारी बजावत असतो. मग त्यामध्ये शाखाधिकारी पासून ते पिग्मी एजंट, शिपाई पर्यंतचा त्यामध्ये समावेश असतो. सर्व सभासदांना विश्वासात घेऊनच संस्थेच्या हिताचे निर्णय घेतले जातात.

प्रत्येक व्यवहारानंतर ग्राहकांसाठी एसएमएस सुविधा

३४ शाखांमधून कोअर बँकिंग प्रणालीद्वारे ही सेवा दिली जात आहे. प्रत्येक व्यवहारानंतर ग्राहकांसाठी एसएमएस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संस्थेत झालेला व्यवहार हा प्रत्येक ग्राहकांच्या दृष्टीने पारदर्शक होण्यास मदत ठरते.

आरटीजीएस व एनइएफटी सुविधा

अन्य बँकेतील एटीएम कार्ड द्वारे पैसे काढण्यासाठी मिनी एटीएम मशीनचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर बाहेरच्या बॅंकेत ऑनलाइन पैसे पाठविण्यासाठी आरटीजीएस व एनइएफटी सुविधा उपलब्ध आहे.

मुदत ठेवींवर आकर्षक तर जेष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्के जास्त व्याजदर

मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर असून जेष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्के व्याजदर जास्त दिले जाते. त्याचबरोबर रिकरिंग ठेव, दामदुप्पट ठेव, लखपती ठेव व कन्यारत्न रिकरिंग ठेव या सारख्या ठेवींही आकर्षक व्याजदरासह स्वीकारली जातात.

सोने तारण व वाहन तारण कर्जाची सुविधा

त्याचबरोबर कर्जस्वरूपामधून वैयक्तिक, मध्यम, दिर्घमुदत तसेच सोने तारण व वाहन तारण कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. संस्थेकडून देण्यात आलेल्या कर्जदारांकडून योग्य वसुलीचे नियोजन करून कर्जाची नियमितपणे परतफेड करून घेतल्याने संस्थेचा रिकव्हरी रेट सुध्दा चांगला आहे.

९०० कोटीकडे वाटचाल सुरू

कोरोना सरख्या कठीण काळात सर्वच स्तरावर आर्थिक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली असतानाही धनश्री मल्टिस्टेटने खातेदारांना तत्पर सेवा देत त्यांचा विश्वास संपादन करून १२ वर्षात ८०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करून ९०० कोटीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.

ठेवीदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे संस्थेची घौडधौड सुरू आहे. यापुढेही खातेदारांचा असाच विश्वास कायम राहील हीच अपेक्षा आम्ही बाळगतो. आणि धनश्री मल्टिस्टेट को- ऑप. सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेच्या वतीने सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतकांना खुप खुप शुभेच्छा व धन्यवाद..

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धनश्री मल्टिस्टेट बँक मंगळवेढा

संबंधित बातम्या

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

भयानक! वडिलांचे सहामहिन्यांपूर्वी निधन, जमीन नाही, स्वतःचे हक्काचे घर नव्हते, हलाखीच्या परिस्थितीमुळे मानसिक तणावाखाली १४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

July 12, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! खोट्या सोन्यावर तारण कर्ज घेण्याची मंगळवेढ्यासह तीन तालुक्यात साखळी, साेलापूर जिल्हा बँकेतील प्रकार, अनेकांवर होणार गुन्हे दाखल; ‘इतके’ शाखाधिकारी निलंबित

July 12, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी ‘या’ तारखेला सोडत; जनतेतून निवड; पुन्हा राजकीय गणिते जुळवावी लागणार

July 11, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

तीन सहकारी बँकांना आरबीआयकडून विविध कारणासाठी दंड; सोलापूर आणि…’या’ बँकेचा समावेश

July 11, 2025
पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

आमदार अभिजीत पाटलांच्या विठ्ठल कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी 10 लाखांची खंडणी; सामाजिक कार्यकर्त्याला अटक

July 11, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

खळबळजनक! विहिरीतील पाण्यामध्ये पडल्याने मंगळवेढ्यातील डॉक्टराचा मृत्यू; पोलीस ठाण्यात खबर दाखल

July 10, 2025
दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रवेश प्रकिया सुरु; विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

दर्जेदार शिक्षण! DMKG काॅलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुविधा सुरू; प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपर्यंत चालणार; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

July 10, 2025
Next Post
मंगळवेढ्याच्या वैभवात भर! हॉटेल प्रिया ‘फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट’चा उद्या शुभारंभ

मेजवानी! 'हॉटेल प्रिया फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट’ आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; मंगळवेढ्याच्या वैभवात भर पडणार

ताज्या बातम्या

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य राखीव पोलिस दलात आता महिलांना संधी मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नियमित पदे निर्माण करण्यास दिली मान्यता

July 13, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता सातबाराची गरज भासणार नाही ; फक्त ‘हा’ क्रमांक असणार बंधनकारक

July 13, 2025
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार; नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून यांची लागणार वर्णी?

July 12, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

भयानक! वडिलांचे सहामहिन्यांपूर्वी निधन, जमीन नाही, स्वतःचे हक्काचे घर नव्हते, हलाखीच्या परिस्थितीमुळे मानसिक तणावाखाली १४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

July 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा