mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अभिमानास्पद! देवमाणूस प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचा ‘या’ संस्थेने ‘शिक्षण व सहकाररत्न’ पुरस्कार देऊन केले सन्मानित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 3, 2022
in मंगळवेढा
अभिमानास्पद! देवमाणूस प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचा ‘या’ संस्थेने ‘शिक्षण व सहकाररत्न’ पुरस्कार देऊन केले सन्मानित

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कृषिभूषण डॉ तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण ता.चिपळूण, जि.रत्नागिरी या संस्थेचा वतीने दर वर्षी वर्धापणदिनाचे औचित्य साधून

कृषि, सहकार, शिक्षण, कला, क्रिडा व साहित्य या क्षेत्रामध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन या संस्थेचा २९ मार्च रोजी आयोजित २९ वा वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई तथा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे हे होते.

याप्रसंगी मंगळवेढा येथील प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी सहकार, शिक्षण व पाणी चळवळीच्या क्षेत्रामध्ये गेल्या ४० वर्षात जे उल्लेखनीय काम केले आहे.

त्याची दखल घेवून संस्थेने प्रा. शिवाजीराव काळुंगे यांना “कृषिभूषण डॉ तानाजीराव चोरगे शिक्षण व सहकाररत्न” हा पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले.

त्याचप्रमाणे गुंजेगांव ता. मंगळवेढा जि. सोलापूर येथील शेतीनिष्ठ शेतकरी व कृषि, जलसंधारण, पाणी आडवा पाणी जिरवा, आदर्श गाव या शासनाच्या योजना सर्व महाराष्ट्रात गावोगावी व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अविरत झटणारे अधिकारी,

कार्यकर्ते व शेतकरी यांना यावरील विविध योजनांचे प्रशिक्षण गेले ४० वर्षे देणारे दत्तात्रय पाटील यानाही “कृषिभूषण डॉ तानाजीराव चोरगे कृषिरत्न पुरस्कार” डॉ तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते देवून आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

सदरप्रसंगी रोख रक्कम पंचवीस हजार, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

सन १९९३ साली डॉ.तानाजीराव चोरगे यांच्या संकल्पनेतून कृषि क्षेत्रामध्ये प्रचार व प्रसार करण्याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता या संस्थेची स्थापना मा. डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केली आणि आज या संस्थेची जवळ जवळ १० ते १२ महाविद्यालये ग्रामिण भागातील मुलामुलींना शिक्षण देण्याचे काम करत आहे.

डॉ.चोरगे यांनी कथा, कादंबरी, नाटक, बँकिंग आदी विषयावरील चाळीसहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे झेप हे सुमारे आठशे पानांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

ते वाचल्यावर एका सर्वसामान्य माणसाने स्वकर्तृत्वाने अनंत अडचणींवर मात करत घेतलेली सामर्थ्यशाली झेप अनुभवास येते. त्यांच्या लेखणीतून उतरलेले जीवनानुभव विविधांगी आहेत. उत्तम सामाजिक भान असलेल्या डॉ. चोरगे यांचे सहकार क्षेत्रातील काम आदर्शवत आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीत त्यांच्या भक्कम नेतृत्वाचे मोठे योगदान आहे.

यावेळी गो.नि. कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजलीताई चोरगे, डॉ.तानाजी चोरगे, प्रा. शिवाजीराव काळुंगे, दत्तात्रय पाटील आदींनी आपले मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.सचिन तांबेकर यांनी केले तर आभार प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मानले.

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शिवाजीराव काळुगे

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकरांनो! गॅसची ‘ई-केवायसी’ त्वरित करा, अन्यथा सबसिडी होईल बंद; ​शांतीसागर इंडेन गॅस कंपनीने नागरिकांना केले आवाहन

February 25, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन; आमदार आवताडेंचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार

February 22, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

February 19, 2026
Next Post
मंगळवेढ्यात घ्या हक्काची जागा; कमर्शियल आणि रेसिडेन्सीयल ओपन प्लॉट उपलब्ध

आणखी महाग! शेतजमिनी, घर खरेदी महागणार; रेडीरेकनर दरांत सरासरी 'इतके' टक्के वाढ

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा