टीम मंगळवेढा टाईम्स ।
भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव विधीमंडळ गटनेता म्हणून निश्चित झालं आहे. त्यामुळे गुरुवारी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील.
भाजपची कोर कमिटीची बैठक संपली आहे. निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीला काहीच क्षणांमध्ये सुरुवात होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली बैठक.
लाडक्या बहिणींच्या साक्षीने शपथविधी होणार
महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘लाडक्या बहिणी’ शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. शपथविधीच्या ठिकाणी ‘लाडकी बहीण कक्ष’ उभारण्यात येणार आहे.
या ठिकाणी १० हजार महिलांची बसण्याची व्यवस्था केली आहे. सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज