mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 28, 2022
in राज्य
Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्यात आता वेगवान हालचाली पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवरुन परतल्यानंतर आता थेट राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.

दिल्लीत फडणवीसांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केलीय. त्यानंतर तातडीने ते मुंबईत दाखल झाले.

आता ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यासह अजून काही भाजप नेते आहेत.

त्यामुळे राज्याच्या सत्ता संघर्षात आता भाजप आणि राज्यपालांची अधिकृत एन्ट्री झाल्याचंच पाहायला मिळत आहे.

बहुमत चाचणीची मागणी करणार?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवरुन परतल्यानंतर आता थेट राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणीस राज्यपालांना बहुमत चाचणीसाठी मागणी करणार असल्याचे बोलले जात आहे.

शेकडो जीआर अपलोड नाहीत

विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की,

जवळपास 450 जीआर शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले असले तरीही विविध विभागांचे अद्यापही शेकडो जीआर अजूनही वेबसाईटवर अपलोडही करण्यात आलेले नाहीत. हे जीआर म्हणजे कोणाचे तरी हित जपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे.

एकाच दिवसात 160 जीआर

दरेकर यांनी सांगितले की, विरोधी पक्ष नेते या नात्याने तीन दिवसांपूर्वी राज्यपालांना पत्र पाठवून एकाच दिवसात 160 जीआर काढण्यात आल्याची माहिती देत हा सर्व प्रकार संशयास्पद असून यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती राज्यपालांकडे केली होती.

अडीच वर्षांच्या काळात सरकारला निर्णय घेण्यास वेळ मिळत नव्हता, पण जे शेकडो जीआर काही दिवासांमध्ये काढण्यात आले, यामध्ये गैरव्यवहार झाल्याची दाट शक्यता असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

जीआर थांबविण्याची विनंती

काही लोकांचे हित साधण्यासाठी घाईगर्दीत हे जीआर काढण्यात आले आहेत. तसेच राज्यात राजकीय अस्थिरता असताना व सरकार अल्पमतात असताना असे निर्णय घेणे उचित नव्हे.

म्हणूनच हे सर्व जीआर थांबविण्याची विनंती आपण राज्यपालांकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पैसे कमविण्याचा सपाटा

राज्य सरकारने जरी शासन निर्णय काढले तरी हा प्रश्न राज्यातील जनतेचा आहे व सर्व पैसा जनतेचा आहे. कारण सरकार हे जनतेचे आहे.

जनतेच्या पैश्यांचा अपव्यय होऊ नये व अवास्तव खर्च होऊ नये. हीच आमची प्रामाणिक भावना आहे असे सांगतानाच दरेकर यांनी सरकार अल्पमतात असताना व राज्यपालांना यांसदर्भात पत्र देऊनही असे शासन निर्णय घेण्यात आले आहेत.

त्यामुळे या सरकारला आता कशाचीच भीती राहिलेली नाही. केवळ पैसे कमविण्याचा सपाटा राज्य सरकारचा दिसत असल्याचा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

सरकार अल्पमतात

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास 50-51 आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला असलेल्या पाठिंब्याच्या संख्येतून हे आमदार कमी केले तर सरकार अल्पमतात असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

32 विभागांचे 443 जीआर

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने 17 जून ते 27 जून या काळात शासनाच्या 32 विभागांकडून एकूण 443 जीआर काढण्यात आले आहेत.

यामध्ये सर्वाधिक 152 जीआर हे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून काढण्यात आले तर मृदू व जलसंधारण विभागाचे 32, शालेय व क्रिडा विभागाचे 27, महसूल व वन विभागाचे 23, सार्वजनिक आरोग्य विभागाचे 22, जलसंपदा विभागाचे 20,

सार्वजनिक बांधकाम विभागाचे 19, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे 17 जीआर आदी प्रमुख विभागांचा समावेश असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज सविस्तरपणे कागदपत्रांसह सादर केली.(स्रोत:TV9 मराठी)

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: देवेंद्र फडणवीस
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
दत्तात्रय भरणे औकातीत राहायचं, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही; आमदार तानाजी सावंत यांचा इशारा

मोठी बातमी! नामदार तानाजी सावंत यांना ‘हे’ खात मिळणार; मंत्रिपदाने मंगळवेढ्यात जल्लोष

August 10, 2022
मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

August 9, 2022
पंढरपूरच्या ‘या’ आश्रमात 32 वारकऱ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू; जेवणात बासुंदीही होती

भ्रमनिरास! सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश आमदार मतदारसंघात; ‘हे’ आमदार मात्र मुंबईकडे मार्गस्थ

August 9, 2022
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

ठरलं तर! आज ‘या’ आमदारांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जाणार; मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

August 8, 2022
अभिमानास्पद! सोलापूरचे सुपुत्र होणार सरन्यायाधीश, आता सुप्रीम कोर्टाचा कारभार मराठी माणसाच्या हाती; ‘या’ तारखेला स्वीकारणार पदभार

अभिमानास्पद! सोलापूरचे सुपुत्र होणार सरन्यायाधीश, आता सुप्रीम कोर्टाचा कारभार मराठी माणसाच्या हाती; ‘या’ तारखेला स्वीकारणार पदभार

August 7, 2022
मंगळवेढेकरांना डे-नाईट सामन्याची मेजवानी; शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

धक्कादायक! क्रिकेटच्या मैदानात झाला आयुष्याचा खेळ; बॉल लागल्याने पंढरपुरातील तरुणाचा मृत्यू

August 7, 2022
Next Post
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

करेक्ट कार्यक्रम! ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू; 'या' तारखेला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

ताज्या बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

August 11, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

August 11, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा