टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रातील माय माऊलांना वर्षाला 3 गॅस सिलिंडरमोफत देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळं आता महिलांना चुलीपुढे धूर फुकण्याची गरज नसल्याचे अजित पवार म्हणाले.
मोहळमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेमध्ये अजित पवार बोलत होते. आता एकदम पारदर्शक कारभार आहे. भ्रष्टाचाराची भानगडच नाही असेही अजित पावर म्हणाले.
गरीबांच्या मुली शिकाव्यात यासाठी दीड हजार कोटी देऊन मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे. तुम्ही म्हणाल की एवढे पैसे आणले कोठून. तर आपल्या राज्याचे स्थूल उत्पन्न 42 लाख कोटी आहे. त्यातून अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटींचा सादर केला होता असेही अजित पवार म्हणाले.
एकूण जीएसटीच्या 16 टक्के जीएसटी एकट्या महाराष्ट्रातून जमा होतो. राज्याला विविध मार्गातून जमा होणाऱ्या पैशातून महिला आदिवासी मागासवर्गीय यांच्यासाठी योजना येत असतात असे अजित पवार म्हणाले.
आम्हाला बहीण आणि भाऊ दोघेही लाडके असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले. वारकरी, ज्येष्ठ नागरिक , मुस्लिम , मातंग सर्वांसाठी ही योजना असल्याचे अजित पवार म्हणाले.
मराठा, ओबीसी, आदिवासी या सर्वांच्या महामंडळाला पैसे दिले आहेत. लोकसभेला मुस्लिम समाजाने आमच्याकडे पाठ फिरवूनही, मुस्लिम समाजासाठी योजना आणून त्यांना 1 हजार कोटी दिले असून कर्जाची हमी सरकारने घेतल्याचे अजित पवार म्हणाले.
आता सर्व पाणी उपसण्याची योजना सोलरवर घेत असल्यामुळे शेतकऱ्यांवर लाईट बिल भरण्याचा बोजा येणार नाही. अशा योजना चांगल्या पद्धतीने चालवू असे अजित पवार म्हणाले. यासाठी या बजेटमध्ये हे वीज बिल सोलर पॅनलमध्ये घेवून शेतकऱ्यांना फक्त पाणीपट्टी भरावी लागेल.
विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडूण आणा असं आवाहन देखील अजित पवार यांनी जनतेला केलं. केवळ एक वर्ष कळ काढा पुढच्या वर्षीपासून सर्व शेतकऱ्यांना रात्री नाही तर दिवसा देखील शेतीला वीज मिळू शकेल असे अजित पवार म्हणाले.
सध्या साडेनऊ हजार मीटर मेगा वॅट वीज सोलर वर बनवत आहे. विरोधक केवळ आमच्यावर टीका करत आहेत. ते दुसरं काही करु शकत नाहीत. कुणी टीका केल्यानं आमच्या अंगाला काही भोक पडत नाहीत, असंही अजित पवार म्हणाले.
पुन्हा युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे मोफत.; भरसभेत अजित पवारांचं आश्वासन
पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांचे मागचे आणि पुढचे बील माफ झालेले असेल. महायुती सरकार आणा पुढील 5 वर्षे मोफत वीज मिळेल. काही योजना या आउट डेटेड झाल्यात म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना आणली. पूर्वी शेतकऱ्यांना लाईट बीलसाठी अनुदान मिळायचे.
मात्र आता यापुढे वीजबिल द्यायचे नाही आणि मागचे बील द्यायचे नाही. पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांचे मागचे आणि पुढचे बील माफ झालेले असेल. महायुती सरकार आणा पुढील 5 वर्षे मोफत वीज मिळेल, असं अजित पवार म्हणाले.
मोफत वीज देण्याचं आश्वासन
काही योजना या आउट डेटेड झाल्यात म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना आणली. पूर्वी शेतकऱ्यांना लाईट बीलसाठी अनुदान मिळायचे. मात्र आता यापुढे वीजबिल द्यायचे नाही आणि मागचे बील द्यायचे नाही. आमचं सरकार आणा, पुढील 5 वर्षे मोफत वीज मिळेल, असा शब्द अजित पवार यांनी यावेळी दिला.
50% फी भरायला नव्हते म्हणून एका मुलीने आत्महत्या केली. अरे मुली काय आत्महत्या करायला जन्माला येते की काय? म्हणून मी सचिवाला बोलवले आणि विचारले किती खर्च येईल. त्यानंतर आम्ही मुलींना मोफत शिक्षणाची योजना आणली, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज