टीम मंगळवेढा टाईम्स ।
जत तालुक्यातील बिळूर जिल्हा परिषद शाळेतील पस्तीस वर्षीय शिक्षक अंबाण्णा नागाप्पा पडवळे (मूळ गाव शिवणगी, ता. मंगळवेढा) यांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
घटनेची माहिती अशी, मंगळवेढा तालुक्यातील शिवणगी येथील मूळचे अंबाण्णा पडवळे होते. जत तालुक्यात गेल्या तेरा वर्षापासून प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते.
गतवर्षी उमदी शिक्षण केंद्रातून बिळूर येथे बदली झाल्याने जत येथे वास्तव्यास आले होते. ताप येऊ लागल्याने शनिवारी जत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यावेळी डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. प्रकृती स्थिर नसल्याने बुधवारी सकाळी मिरज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना बुधवारी सायंकाळी निधन झाले आहे.
पडवळे यांच्या पक्षात पत्नी, दोन मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. पंधरा दिवसात तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. माडग्याळ येथे दि. ११ सप्टेंबर रोजी एका तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी पडवळे या शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज