टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आज दि.२० डिसेंबर रोजी शिव मुक्काम दिनानिमित्त सायं ६.०० वाजता
शिवालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तिचे पूजन करून दीपोत्सव व मिठाई वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी यांनी दिली.
आज दि.२० डिसेंबर १६६५ रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवरती जात असताना मंगळवेढे येथे मुक्कामी होते.
यामुळे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली मंगळवेढा नगरी म्हणून ओळखली जाते प्रत्येक वर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबवून शिव मुक्काम दिन साजरा केला जातो.
या मुक्काम दिनानिमित्त लख्ख दिव्यांनी शिवालय उजळून निघणार आहे यासाठी सदर कार्यक्रमास सर्व शिवभक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 7588214814
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 7588214814 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज