mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपूरमध्ये ‘या’ ठिकाणी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल : प्रांताधिकारी सचिन ढोले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पंढरपूरमध्ये ‘या’ ठिकाणी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल : प्रांताधिकारी सचिन ढोले

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूर शहरातील सहा हॉस्पिटल  अधिग्रहीत करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. यापैकी उपजिल्हा रुग्णालयासह सहा हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असून बेडची संख्या 180 आहे, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विठ्ठल हॉस्पिटल येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर विकसित करण्यात आले आहे.  Dedicated Covid Hospital at six places in Pandharpur

  


पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर उपाययोजना सुरु केल्या आहेत. यामध्ये  संपर्क शोधणे, तपासणी व उपचार करणे तसेच  संस्थात्मक क्वारंटाईन करणे यावर भर देण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची व्यापक प्रमाणात रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करण्यात येणार आहेत, असे श्री. ढोले यांनी सांगितले.

  

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील लाईफलाईन, गॅलॅक्सी, गणपती, जनकल्याण, विठ्ठल,ॲपेक्स तसेच उपजिल्हा रुग्णालय अशी एकूण सात हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून सुरु करण्यात आली आहेत. तपासणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी  रोहन व निष्कर्ष पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातूनही तपासणी करण्यात येणार आहे. या दोन्ही खाजगी लॅबना तपासणीसाठी परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला असल्याचेही  श्री.ढोले यांनी सांगितले.


         

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले असून या पथकामार्फत नागरिकांची तपासणी व जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर  मेडीकल असोशिएनचे अध्यक्ष प्रशांत खलिपे यांच्यामार्फत गंभीर रुग्णांना उपयुक्त ठरणाऱ्या इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन बाधितांचे वेळेत निदान करणे शक्य होईल, असे आवाहनही श्री.ढोले यांनी केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
तावशी गावात अवैध धंद्याचा धुमाकूळ; प्रशासन लक्ष देईना!

तावशी गावात अवैध धंद्याचा धुमाकूळ; प्रशासन लक्ष देईना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

April 4, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 4, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

April 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा