मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या मंगळवेढा शहरातील काझी गल्ल्ली परिसरातील मोहम्मद हिरालाल बेदरे यांचा अखेर दोन महिन्यांनी मृत्यू झाला आहे.
मंगळवेढा शहरात गेल्या काही महिन्यापासून एक काळ्या रंगाचे मोकाट कुत्रे जखमी अवस्थेत फिरत होते.
दोन महिन्यापूर्वी त्या कुत्र्याने मंगळवेढा शहरातील सुमारे १५ जणांचा चावा घेतला होता. जखमींना मंगळवेढा येथील खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सदरचा कुत्रा हा लोकांना चावत सुटले होते. या कुत्र्याने शहरातील शनिवार पेठ,जगदाळे गल्ली, माने गल्ली, बोराळे नाका, सराफ गल्ली येथील १२ जणांना चावा घेतला आहे.
मात्र सायंकाळच्या सुमारास कांही युवकांनी एकत्र येवून त्या कुत्र्यास ठार मारल्याने लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता.
मोहम्मद हिरालाल बेदरे यांनाही हे कुत्रे चावल्यामुळे त्यांचेवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच रविवार दिनांक १४ मे रोजी त्यांचे निधन झाले.
दरम्यान, कोणालाही अशा प्रकारचा कुत्रा जर चावला त्यांनी त्वरित उपचार घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज