टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा ३२ वा गळीत हंगाम शुभारंभ मागील गळीत हंगामात सर्वात जास्त ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या हस्ते पार पडला. गळीत हंगाम शुभारंभाचा मान दामाजीने शेतकऱ्यांना दिला.
अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष अॅड. नंदकुमार पवार होते. तत्पुर्वी संचालक भिवा दाजी दोलतडे व त्यांच्या सुविद्य पत्नी इंदुबाई यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापुजा करण्यात आली.
तर मोळी पुजन यामध्ये रोहित गावडे (रहाटेवाडी), सिध्दाराम चौगुले, सिध्दराया चौगुले, अनिल चौगुले (सिध्दापूर), सावित्री शेट्टी (बोराळे), सुरेश कलुबर्मे, (माचणूर), प्रताप रोकडे, प्रविण जाधव, नितीन भोसले, (मुढवी), बाळासो चव्हाण (मंगळवेढा) या शेतक-यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले, गेल्या गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणा-या शेतक-यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.
मागील हंगामातील सर्व देणी देवून एफ.आर.पी.पेक्षा जादा ऊस दर दिला. कामगारांचा मागील 32 महिन्याचा थकित प्रा.फंड भरुन पगार वेळचे वेळी केले, गाळप हंगामासाठी पूर्ण क्षमतेने तोडणी वाहतूक यंत्रणा भरती केली असुन, आसपासच्या इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसदर देण्यास संचालक मंडळ कमी पडणार नाही.
यंदाच्या गळीत हंगामात ५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्षि्ट ठेवले. अॅड. पवार म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा कारखाना विद्यमान संचालक मंडळाने चांगला चालविला. दामाजी कारखाना टिकविणे सभासद, शेतक-यांचे काम आहे.
याप्रसंगी उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे,
सुरेश कोळेकर, माजी संचालक मारुती वाकडे, भारत पाटील, जालिंदर व्हनुटगी, महादेव फराटे, सभासद शेतकरी, खाते प्रमुख, विभागप्रमुख, कामगार उपस्थित होते. प्र. कार्यकारी संचालक श्री. रमेश जायभाय यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज