टीम मंगळवेढा टाईम्स
श्री.संत दामाजी कारखाना सभासद अपात्र नोटीसाप्रकरणी आज सोमवारी मंगळवेढ्यात बैठक आयोजित करण्यात आली असून सर्व संस्था सभासदांनी आलेली नोटीस घेवून बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन अॅड. नंदकुमार पवार यांनी केले आहे.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने यापुर्वी 28 हजार 194 सभासदापैकी 18 हजार 657 सभासदांना व 240 संस्था सभासदांपैकी 213 संस्था सभासदांना अक्रियाशील सभासद केल्याच्या नोटीसा दिल्या होत्या.
दि.28 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढून सहकारी कायदयात चौथी दुरुस्ती करून 31 मार्च 2020 पर्यंत होणार्या निवडणूकीसाठी सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार बहार केला.
दामाजी कारखान्याच्या सर्व 28 हजार 194 सभासद व 240 सहकारी संस्था सभासदांना मतदानाचा अधिकार मिळाला. आता परत दि. 28/12/2020 रोजी 240 संस्था सभासदापैकी 79 विविध कार्यकारी सोसायटया वगळता 161 दुध डेअरी, शिक्षण व इतर संस्था सभासदांना अक्रियाशील असल्याच्या व सभासदांना तुमचे नाव रजिस्टरमधून का कमी करू नये अशा नोटीसा देवून आठ दिवसात खुलासा करण्यास सांगितले आहे.
याबाबत कायदेशीर उत्तर देण्यासाठी आज सोमवार दि. 4 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता मंगळवेढा येथील सह्याद्री या निवासस्थानी बैठक आयोजित केल्याचे संत दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अॅड.नंदकुमार पवार यांनी सांगीतले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज