मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातही पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पीक विम्यापोटी नुकसान भरपाई देण्यासाठी पिकांची पाहणी करण्यात येणार आहे.
त्यासाठी विमा कंपनी प्रतिनिधींसह प्रत्येक तालुक्यासाठी सहा जणांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती शेतात जाऊन पिकाची पाहणी करेल.
पिकांच्या नुकसानीची टक्केवारी निश्चित करून आज शुक्रवारी जिल्हा कृषी कार्यालयास अहवाल सादर करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी काढला आहे.
जिल्ह्यात जुलै ते ऑगस्ट दरम्यान पावसात खंड पडल्याने शेती उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक विमा देण्यासाठी सहा जणांची समिती गठित करण्यात आली आहे.
त्यात तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, ओरिएन्टल कंपनीचे विमा प्रतिनिधी, दोन कृषी सहाय्यक, संबंधित शेतकरी असतील.
असा होईल सर्व्हे
मंडळातील ५ टक्के क्षेत्राचा सरासरी सर्व्हे करण्यात येईल. यात गाव निवड करून गावातील दहा वेगवेगळी ठिकाणे निश्चित करण्यात येतील. त्याचे सर्वेक्षण करण्यात येईल.
काही बदल झाल्यास पुन्हा सर्वेक्षण करण्यात येईल. त्यात पिकाची पाहणी करून महसूल मंडळनिहाय पिकांच्या नुकसानीची टक्केवारी निश्चित करण्यात येईल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज