सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची माहिती कृषी विभागास तात्काळ कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
त्यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. त्यांनी अधिसूचित पिकाचे नुकसान झाले असल्यास 72 तासांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनीस किंवा कृषी विभागास दयावी.
नुकसान कळवताना सर्व्हे क्रंमाक, नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळवणे बंधनकारक आहे. Damage to agriculture due to heavy rains in Solapur district; Give information in this way, appeal of solapur district administration
शेतक-यांनी नुकसानीची माहिती कळवल्यास विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी आणि संबंधित शेतकरी यांचा समावेश असणारी समिती नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करेल.
ज्या शेतक-यांचे नुकसाने झालेले आहे अशा शेतक-यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop Insurance हे ॲप डाउनलोड करुन त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती दयावी किंवा 18001037712 या टोल फ्री क्रमांकावर किंवा customer.service@bharatiaxa.com या ईमेलवर माहिती दयावी असे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले आहे.
बंगला विकणे आहे.
३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज