टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूरसह नऊ गावात संचारबंदी करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. आषाढीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त साईनाथ करण्यात येणार आहे.
दि.20 जुलै रोजी आषाढी यात्रेला यात्रेची सुरूवात होणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी 11 ते 28 जुलै दरम्यान बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
बंद काळात मंदिरातील धार्मिक विधी परंपरा करण्यात येणार आहेत. प्रतिवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला येणाऱ्या विविध संस्थानाच्या पालखी सोहळ्यामध्ये पालख्यांची श्री विठ्ठल रुक्मिणी मातेशी पादुका बीजी भेटीची परंपरा आहे.
दहा पालक यांना शासन स्तरावरून परवानगी देण्यात आली आहे. श्री संत एकनाथ महाराज संस्थान पैठण जिल्हा औरंगाबाद श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक श्री चांगवटेश्वर देवस्थान सासवड जिल्हा पुणे श्री संत सोपानदेव महाराज संस्थान मुक्ताईनगर
जिल्हा जळगाव विठ्ठल रुक्माई संस्थान कौंडण्यपूर अमरावती श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू जिल्हा पुणे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी जिल्हा पुणे श्री संत नामदेव महाराज संस्थान तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर श्री संत निळोबाराय संस्थान पिंपळनेर जिल्हा अहमदनगर या पालखी या पालखींना परवानगी देण्यात आली आहे.
मानाच्या पालक यांचा प्रवास आणि वारकऱ्यांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. यावर्षी दोन बस व प्रत्येकी बसमध्ये 20 याप्रमाणे 40 वारकऱ्यांची संख्या निश्चित करून 19 जुलै रोजी दिवशी वाखरी या ठिकाणी जाण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
वारकर्यांची यादी संबंधित प्रत्येक संस्थानाने स्थानिक पोलिस प्रशासनाला तसेच संस्थानाचे पास त्यांना देण्यात येणार आहे. वारकरी प्रतिनिधी सवय सोहळ्यात सहभागी होण्याच्या तिच्या लगत पूर्वीच्या दोन दिवस कालावधीत आरटी-पीसीआरद्वारे कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे.
प्रतिकात्मक स्वरूपात सर्व मानाच्या दहा पालखी सोहळ्यात 19 जुलै रोजी पोहोचल्यानंतर मंदिर व प्रशासन यांच्या वतीने योग्य तो सन्मान करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत वाखरी पालखी तळावर ते पोहोचतील असे नियोजन करण्यात आले आहे.
चाळीस वारकऱ्यांना प्राथमिक स्वरूपात पायी वारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच विसावा मंदिर इस्बावी पासून ते पंढरपूरपर्यंत सर्व साधारणत: साडेतीन किलोमीटरपर्यंतचे अंतर सर्व पालखी सोहळ्याचे सर्वांचे एकत्रित मिळून एकूण वीस वारकऱ्यांचं पाळी वारे करण्याचे शासनाने परवानगी दिली आहेत.
उर्वरित 380 वारकरी यांनी आपापल्या बसणे पंढरपूर डे जाण्याची सोय करण्यात आली आहे 20 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पहाटे दोन वीस ते साडेतीन वाजेपर्यंत शासकीय पूजा करण्यात येणार आहे. पंढरपूर भटुंबरे चिंचोळी भोसे शेगाव दुमाला लक्ष्मी टाकळी गोपाळपूर वाखरी कोर्टी दादेगाव शिरढोण कवठाळी या गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पंढरपूर एसटी महामंडळाच्या आजारातून सुरू असणारे सर्व प्रकारची वाहतूक सेवा तसेच अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व खाजगी वाहतूक सेवा 17 ते 25 जुलै दरम्यान बंद राहणार आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता वारकऱ्यांना चंद्रभागा नदीत स्नान करण्यास बंदी करण्यात आली आहे. तर पोलीस प्रशासनाकडून तीन हजार तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा सिव्हिल सर्जन डॉक्टर प्रदीप ढीले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव यांची उपस्थिती होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज