टीम मंगळवेढा टाईम्स ।
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा नगरोत्थान योजनेतून मंगळवेढा नगरपरिषदेस विविध विकास कामांकरिता 2 कोटी 60 लाख रुपये निधी मंजूर झालेची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांची पाहणी करणे साठी आले असता.
मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठविला असून त्यास निधी मिळावा अशी मागणी भगिरथ भालके, जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप, नगराध्यक्षा अरूणा माळी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस लतिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,बांधकाम सभापती प्रविण खवतोडे,आरोग्य सभापती संकेत कल्लाप्पा खटके महिला बालकल्याण सभापती भागीरथी नागणे,
नियोजन व विकास समिती सभापती अनिल बोदाडे, विरोधी पक्षनेत्या निर्मला माने, नगरसेविका अनिता नागणे, राजश्री टाकणे, सुमन शिंदे, सब्जपरी मकानदार, लक्ष्मी म्हेत्रे, पारूबाई जाधव, रतन पडवळे, नगरसेवक पांडूरंग नाईकवाडी, रामचंद्र कोंडूभैरी, प्रशांत यादव, राहुल सावंजी, बशीर बागवान यांनी पालकमंत्री महोदयाकडे केलेली होती.
तसेच सदरच्या कामास मंजूरी देवून निधी देण्याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोबत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळूंखे पाटील यांनी मुंबई येथे चर्चा करून निधी मंजूरी साठी प्रयत्न केले.
त्यानुसार मंगळवेढा शहरातील नागणेवाडी पाण्याची टाकी ते हॉटेल राजयोग पर्यत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे, निमजगा स्मयशानभूमी सांगोला रोड कडील बाजूस वेटींग शेड नं.१ बांधकाम करणे, दामाजी चौक ते शिवप्रेमी चौक रस्ता डांबरीकरण करणे, दामाजी चौक ते शिवप्रेमी चौक रस्ता मार्गाचे फुटपाथ तयार करणे, दामाजी रोड शॉपिंग सेंटर समोर पेव्हर ब्लॉ्क बसविणे,
दत्ता मेडीको दुकान ते पंपू राजमाने घरापर्यत रस्ता कॉक्रीट करणे व गटार करणे, देवकर वाडा ते जोशी वकील घरापर्यत रस्ता् कॉक्रीटीकरण व गटार करणे, सागर शहा घर ते हरिप्रसाद देवकर घरापर्यत रस्ता कॉक्रीट करणे, पांचाळ घर ते अविनाश चेळेकर घरापर्यत रस्ता् कॉक्रीटीकरण करणे, बजरंग सुरवसे घर ते नरेंद्र मर्दा घरापर्यत रस्ता मार्गाचे कॉक्रीटीकरण करणे, सुरेश करंदीकर घर ते चिटणीस घरापर्यत रस्ताे कॉक्रीटीकरण करणे, बडोदकर घरासमोर रस्ता कॉक्रीटीकरण करणे,
नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत बांधण्यांत आलेल्या उद्योग प्रशिक्षण केंद्र इमारतीस कंपौंड बांधकाम करणे, शहरातील ज्ञानेश्वर मंडले घर ते दामू आदमाने घर व इतर 19 ठिकाणी कॉंक्रीट पेव्हर ब्लॉक बसविणे,
मंगळवेढा शहरातील सि.स.नं 4052 सरकारी मालकीच्या जागेत बगीच्या विकसीत करणे. या विकास कामांना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी प्रशासकिय मंजूरी व निधी वितरीत आदेश दिला असून सदरची कामे झाल्यानंतर शहराच्या विकासात भर पडणार आहे.
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत 3 कोटी 1 लाख रुपये निधी मंजूर- अजित जगताप
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत मंगळवेढा नगरपरिषदेस विविध विकास कामांकरिता 3 कोटी 1 लाख रुपये निधी मंजूर झालेची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांची पाहणी करणे साठी आले असता स्वत: साठेनगर येथे जाऊन तेथील नागरीकांशी चर्चा केली त्यानुसार नगरपरिषदेने आण्णाभाऊ वस्ती सुधारणा योजनेतून 4 कोटी 76 लाख रूपयेचा विविध विकास कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविला त्यास निधी मिळावा अशी मागणी भगिरथ भालके, जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप, नगराध्यक्षा अरूणा माळी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस लतिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,बांधकाम सभापती प्रविण खवतोडे,
आरोग्य सभापती संकेत कल्लाप्पा खटके महिला बालकल्याण सभापती भागीरथी नागणे, नियोजन व विकास समिती सभापती अनिल बोदाडे, विरोधी पक्षनेत्या निर्मला माने, नगरसेविका अनिता नागणे, राजश्री टाकणे, सुमन शिंदे, सब्जपरी मकानदार, लक्ष्मी म्हेत्रे, पारूबाई जाधव, रतन पडवळे, नगरसेवक पांडूरंग नाईकवाडी,
रामचंद्र कोंडूभैरी, प्रशांत यादव, राहुल सावंजी, बशीर बागवान यांनी पालकमंत्री महोदयाकडे केलेली होती तसेच सदरच्या कामास मंजूरी देवून निधी देण्याबाबत पालकमंत्री दत्तात्रयमामा भरणे यांच्या सोबत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळूंखे पाटील यांनी मुंबई येथे चर्चा करून निधी मंजूरी साठी प्रयत्न केले.
त्यानुसार मंगळवेढा शहरातील बाळू अवघडे घरासमोर ,विनोद अवघडे घर ते नवनाथ अवघडे घर ,नागनाथ सावंजी घर ते पंढरपूर रोड पर्यत ,भारत दत्तू घर ते खंडू दत्तूर घरापर्यत रस्ता मार्गावर पेव्हेर ब्लॉक बसविणे, शहरातील डोंगरे पिठाची गिरणी ते सावंजी गुरुजी घरापर्यत रस्ता मार्गावर पेव्हर ब्लाक बसविणे,
शहरातील दिलीप निकम घर ते मुरलिधर सरकळे घरापर्यतचा रस्ता कॉक्रीट करणे, मेहतर कॉलनी ते कुंभार तलावाकडे जाणा-या रस्तावर कॉक्रीटीकरण व सी.डी.वर्क करणे, शहरातील शिशु विहार चौक ते नवीन कोर्ट इमारती पर्यतचा रस्ता करणे,
शहरातील शिशू विहार चौक ते नविन कोर्ट इमारत पर्यतच्या रस्ता मार्गाचे दोन्ही बाजूंनी गटार करणे, साठेनगर येथील सि.स.नं.२७१ आ.क्र.५६ मध्ये पाण्यााची टाकी बांधकाम करणे, सोलापूर रोड हिंदू स्मशानभूमी ते तहसिल कार्यालय पर्यत रस्ता् डांबरीकरण करणे, साठेनगर येथील सि.स.नं.२७१ आ.क्र.५६ मध्येि स्टाेफ कॉर्टर बांधकाम करणे,
शहरातील कांतीलाल दत्तू घर ते कदम घरापर्यत गटार करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे या विकास कामांना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी यापैकी 3 कोटी 1 लाख रूपयांचे कामास प्रशासकिय मंजूरी व निधी वितरीत आदेश दिला असून उर्वरित 1कोटी 76 लाख रुपयांचे प्रस्तावास लवकरच मंजूरी देण्यात येणार असून सदरची कामे झाल्यानंतर शहराच्या विकासात भर पडणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज