टीम मंगळवेढा टाईम्स । भारत कोरोनाचे लाट उसळली असून त्यामुळे आयपीएल होणार नाही अशी शक्यता वर्तवली होती.जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली. मात्र भारतातील कोरोनाचे संकट आता आणखीनच गडद झाले असल्याने IPL होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र आता यंदा ही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित झालं असून आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनीच याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. Good news for cricket fans! The matches will start from IPL date
’19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्याबाबत आमची चर्चा झाली. या स्पर्धेत सामील होणाऱ्या संघांनाही आम्ही याची माहिती दिली आहे,’ असं ब्रिजेश पटेल यांनी म्हटलं आहे.दरम्यान, कोरोनामुळे भारतात ही स्पर्धा होणार नसल्याचं याआधीच स्पष्ट झाले होतं.
IPL कौन्सिल चेअरमन ब्रिजेश पटेल ही स्पर्धा युएईमध्ये होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं. यादरम्यान 60 सामना होणार असल्याचे सांगितले जात आहे. पटेल पुढे म्हणाले की – अबू दाबी, दुबई, शारजाह ही तीन मुख्य ठिकाणं असणार आहे. सरकारच्या परवानगीनंतर लीगचा संपूर्ण प्लान आखण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
आयपीएल 2020चे सर्व सामने सायंकाळी 7.30 वाजता सुरू केले जाऊ शकतात. भारतीय वेळेनुसार हे सामने 8 वाजता सुरू होतील, तर 7.30 वाजता टॉस होईल. याआधी काही सामने दुपारी 4 वाजताही आयोजित करण्यात येत होते, मात्र यंदा युएईमध्ये ही स्पर्धा होत असल्याचे सर्व सामने 8 वाजताच खेऴवले जातील.
युएईमध्ये आयपीएल येऊ शकेल अशी बातमी येताच तेथील क्रिकेट असोसिएशनने तयारी सुरू केली. दुबई स्पोर्ट्स सिटीचे क्रिकेट इव्हेंटचे प्रमुख सलमान हनीफ म्हणाले की, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि आयसीसी अॅकॅडमी असलेले दुबई स्पोर्ट्स सिटी सामन्यांसाठी सज्ज आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 9 खेळपट्ट्या आहेत, ज्यामुळे येथे खेळपट्टी तयार करण्यात कोणतीही अडचण नाही. याआधी 2014 मध्ये आयपीएलचे निम्मे सामने युएईमध्येच घेण्यात आले होते आणि भारतीय चाहत्यांनी त्याचा प्रचंड आनंद लुटला होता. याशिवाय 2009मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन केले होते.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज