मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । एम . एस . धोनीने मागील वर्षी विश्वचषकानंतरच निवृत्ती घ्यायला हवी होती . त्याने निवृत्तीबाबतचा निर्णय असा अधांतरीच का ठेवला आहे हे त्यालाच माहीत असे म्हणत , पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने धोनीच्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चेत आपलेही मत मांडले.
धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या वर्षीच्या विश्वचषकापासून आडाखे बांधले जात आहेत . आता त्याबाबत शोएब अख्तरने आपले मत मांडताना सांगितले की , अपेक्षा आहे की , ३८ वर्षीय धोनीला सन्मानाने निरोप मिळेल . जरी आता हे माहिती नसले की खेळ कधी सुरू होईल.
त्याने इस्लामाबादमध्ये पीटीआयशी बोलताना सांगितले की , या खेळाडूने आपल्या पूर्ण क्षमतेने क्रिकेटची सेवा केली आहे . त्याला पूर्ण सन्मानाने निरोप दिला गेला पाहिजे . तो म्हणाला मी धोनीच्या जागी असतो तर कधीच निवृत्ती स्वीकारली असती . मी लहान प्रकारात तीन – चार वर्षे अजून खेळू शकत होतो . मात्र , मी २०११ च्या विश्वचषकानंतर निवृत्ती घेतली . कारण मी क्रिकेटला माझे शंभर टक्के योगदान देऊ शकत नव्हतो.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज