मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईटच्या वापरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. यावर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संघटनांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी
डीजे बंदी व लेझर लाईटवर २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत बंदीचा आदेश बजावला. यावर स्थगिती मिळावी यासाठी दाखल केलेली याचिका दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) एस.एस. वनकोरे यांनी कल दि.४ सप्टेंबर रोजी फेटाळली.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापर न करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाविरोधात योगेश पवार यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, सोलापूर यांच्या कोर्टात याचिका दाखल करुन डीजे व लेझर लाईट शो बंदीला स्थगिती मागितली होती;
परंतु लोकांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने दिवाणी न्यायाधीशांनी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट शो ला बंदी घातलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला.
त्यामुळे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिनांक २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी जारी केलेले बंदी आदेश कायम राहणार आहेत.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज