मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । निर्भया रेप केसमध्ये 20 मार्चला दोषींना होणार्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने चारही दोषींच्या डेथ वॉरंटला स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाने यासंदर्भात दाखल याचिका फेटाळली आहे. गुरुवारी पटियाला हाऊस कोर्टा सुनावणीची दरम्यान हाय होल्टेज ड्रामा झाला.
कोर्ट रूममध्ये दोषी अक्षय कुमारच्या पत्नीने जजच्या समोर रडण्यास सुरूवात केली. अक्षय कुमारच्या पत्नीने निर्भयाची आई आशा देवीचे पाय पकडून म्हटले की, तुम्ही माझ्या आईसारख्या आहात ही फाशी थांबवा.निर्भयाच्या चारही दोषींना (पवन कुमार गुप्ता, विनय कुमार शर्मा, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह) शुक्रवारी सकाळी 5:30 वाजता फाशी देण्यात येणार आहे.
Delhi's Patiala House Court dismisses the plea of 2012 Delhi gangrape convicts seeking a stay on execution pic.twitter.com/QwvIFezMuA
— ANI (@ANI) March 19, 2020
चार दोषींना वाचवण्यासाठी वकील एपी सिंह यांनी फाशीला स्थगिती देण्यासाठी दिल्लीच्या पटियाला कोर्टात याचिका केली होती. जिच्यावर गुरूवारी सुनावणी झाली. वकील एपी सिंह यांनी म्हटले की, दोषी पवन गुप्ताच्या सुधारित याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी बाकी आहे आणि दोषी अक्षय सिंहची दया याचिका प्रलंबित आहे, अशा स्थितीत डेथ वॉरंटला स्थगिती देण्यात यावी.
जाहिरात –
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज