मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून यामध्ये भाजप राष्ट्रवादीला 11 जागा तीर्थक्षेत्र विकास आघाडीला नगराध्यक्ष व 9 जागेवर उमेदवार विजयी झाले आहेत.
आता स्वीकृत नगरसेवक पदी कोणाची वर्णी लागणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे मागणी केली होती.

तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून उमेदवारी मिळावी यासाठी बबनराव आवताडे व सिध्देश्वर आवताडे यांच्याकडे मागणी केली होती.
मात्र सर्वांना उमेदवारी देणे शक्य नसल्यामुळे स्वीकृत म्हणून वर्णी लावण्यात येईल असा शब्द नेत्यांनी दिला होता.

मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे, नगराध्यक्षपदी सुनंदा आवताडे विजयी झाल्या आहेत. आता नगराध्यक्ष व नगरसेवक नगर परिषदेचे कामकाज पाहण्यास सुरुवात करणार आहेत या अगोदर स्वीकृत नगरसेवकाची निवड करण्यात येणार आहे.

सहा नगरसेवका मागे एक नगरसेवक निवडण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे त्यांना 1 किंवा 2 स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत.

तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 9 नगरसेवक असल्यामुळे त्यांना 1 स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत.
आमदार समाधान आवताडे यांनी नगरपरिषदेची उमेदवारी देताना अनेकांना पुनर्वसन करण्यात येईल असा शब्द दिला आहे.

यामुळे आवताडे यांच्याकडून स्वीकृत सदस्य म्हणून अजित जगताप, सतीश कोंडूभैरी, धनंजय खवतोडे, सुशांत हजारे, दिगंबर यादव, तात्या पाटील, चंद्रकांत पडवळे, आदित्य हिंदुस्थानी,मुन्ना मुलाणी यांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र अंतिम निर्णय आमदार आवताडे घेणार आहेत.
तर तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून प्रभाग 8 मधून निवडणूक लढवलेले महादेव धोत्रे, करण नागणे, प्रभाग 5 मधून निवडणूक लढवलेले राहुल वाकडे, राहुल घुले, अजित यादव यांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र स्वीकृत सदस्य म्हणून कोणाला संधी मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














