mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नवे संकट! घरोघरी खो खो खोकला; कोरोनानंतर आता नवी डोकेदुखी, रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली; काळजी घेण्याचे आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 6, 2023
in आरोग्य, राज्य
नवे संकट! घरोघरी खो खो खोकला; कोरोनानंतर आता नवी डोकेदुखी, रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली; काळजी घेण्याचे आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स। 

गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात ‘इन्फ्लुएन्झा ए’ या विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एच३एन२’चा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत आहे.

परिणामी खोकला आणि ताप यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. या विषाणूची बाधा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिले आहेत.

घराघरांत खोकल्याची लागण झाल्याचे चित्र सध्या आहे.आयसीएमआरचे वैज्ञानिक श्वसनाशी संबंधित उद्भवणाऱ्या या आजाराकडे विविध विषाणू संशोधन प्रयोगशाळा माध्यमांतून लक्ष ठेवून आहेत. तसेच या विषाणूच्या संसर्गात अँटिबायोटिकचा अतिरेक करू नये.

रुग्णाची तपासणी करून गरज असेल तरच त्याचा वापर करावा, अशा सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनने केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत मुंबईसह राज्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात खोकला येत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर अशा पद्धतीच्या रुग्णांत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

काय आहे नेमका हा प्रकार?

सर्वसाधारणपणे थंडी आणि पावसाळ्यात इन्फ्लुएंझा आढळून येत असतो.या इन्फ्लुएंझा विषाणूचे ए, बी, सी असे तीन प्रकार आहेत. त्यांपैकी ‘इन्फ्लुएंझा ए’ या विषाणूच्या प्रकारामुळे खोकला आणि ताप येत असतो. हा एका विशिष्ट हंगामात दिसणारा विषाणू आहे. या आजाराला घाबरण्याची गरज नसली तरी डॉक्टरांचा सल्ला वेळेत घेणे गरजेचे आहे.

हवेतून पसरणारा विषाणू

खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. मात्र विषाणूंसोबत वातावरणात प्रदूषण असल्याने त्याचा परिणामही दिसून येत आहे. हा हवेतून पसरणारा विषाणू आहे. त्यामुळे मास्क घाला. तसेच रोगप्रतिकारकी शक्ती चांगली राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा वापर आहारात करावा.

घरी आल्यावर कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्यात थोडे मीठ टाकावे. आता उन्हाळा सुरू झाला असून पाणी जास्त प्रमाणात ठेवावे. लहान मुलांना ताप-खोकला येत असल्यास शाळेत पाठवू नये. या खोकल्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते, त्यामुळे कोरोनाकाळात ती काळजी घेतली ती घ्यावी – डॉ. श्रीनिवास चव्हाण, कान, नाक, घसा विभागप्रमुख, सर जे. जे. रुग्णालय.

काय करावे?

साबणाने नियमित हात धुवून घ्या.
जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आजाराचे लक्षणे आढळली तर मास्क वापरा.
खोकताना तसेच शिंकताना नाक आणि तोंडावर रुमाल धरा. द्रवरूप पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करा. ताप तसेच अंगदुखीचा त्रास होत असेल तर पॅरासिटामॉल घ्या.

सध्याचा हंगाम या विषाणूला पोषक

‘एच३ एन२’ विषाणू ‘इन्फ्लुएंझा ए’चा उपप्रकार नवीन नाही. सद्य:स्थितीत १० ते २० टक्के वातावरणात हा विषाणू पसरला आहे. सध्याचा हंगाम या विषाणूला पोषक असा आहे. डॉ. नितीन आंबाडेकर,
संचालक, आरोग्य विभाग

डॉक्टरांचा सल्ला काय?

सध्या बहुतांश लोकांना ताप, सर्दी, घसादुखी, अंगदुखी आदी त्रास होत आहेत. हे सर्व इन्फ्ल्युएंझामुळे होत आहे. या आजारांमध्ये रुग्णाला अँटिबायोटिक्स अजिबात देऊ नका.(स्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: रुग्णालयात दाखल

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

महाराष्ट्र हादरला! आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या; आश्रमातच…

June 28, 2025
गाडीला चॉईस नंबर हवा आहे, मग ‘हे’ काम करा; सोलापूर जिल्हा आर.टी.ओ चे आवाहन

वाहनधारकांनो! वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नाही केले, तर पाच हजार रुपये दंड आकारला जाणार, दरदिवशी होणार ‘एवढा’ रुपये दंड

June 28, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 28, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 27, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! इतिहासात प्रथमच आता लवकरच महागड्या वीजेपासून होणार सुटका; कोणाला होणार फायदा?

June 26, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
Next Post
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

खुशखबर! सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उजनीच्या कालव्यातून जूनअखेर आणखी 'इतकी' आवर्तने मिळणार; 'या' भागात पाणी चाेरी थांबणार

ताज्या बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

महाराष्ट्र हादरला! आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या; आश्रमातच…

June 28, 2025

खळबळ! महाविदयालयात परीक्षेस आलेली १९ वर्षीय मुलगी मंगळवेढ्यातून बेपत्ता; ‘या’ वर्णणाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलीसांशी संपर्क साधा

June 28, 2025
गाडीला चॉईस नंबर हवा आहे, मग ‘हे’ काम करा; सोलापूर जिल्हा आर.टी.ओ चे आवाहन

वाहनधारकांनो! वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नाही केले, तर पाच हजार रुपये दंड आकारला जाणार, दरदिवशी होणार ‘एवढा’ रुपये दंड

June 28, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

धर्म आणि जातीच्या भिंती तोडून मुस्लिम तरुणाच्या अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन; एक लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण

June 28, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..