टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरात कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नी व दोन लहान मुलांना गळफास लावून अमोल जगताप यांनी स्वतः गळफास घेतला होता. या गुन्ह्यात शहर गुन्हे शाखेने नगरसेवक लक्ष्मण जाधव व दशरथ कसबे या दोघांना अटक केली आहे. Corporator arrested along with five moneylenders in Solapur bar owner’s death
जुना पुना नाका येथील हांडे प्लॉटमध्ये रजपूत वकिलाच्या घरात भाड्याने राहणारे अमोल अशोक जगताप (वय 37) हे तालुका उत्तर सोलापूर येथे कोंडी हद्दीत गॅलॅक्सी ऑर्केस्ट्रा बार चालवत होते. लॉकडाऊनमुळे सर्व धंदे बंद पडल्यावर अमोल जगताप यांचा ऑर्केस्ट्रा बार सुद्धा बंद होता. त्यामुळे त्यांना कर्ज काढावे लागले होते.
जवळपास 70 लाखांपेक्षा जास्त कर्ज झाल्याने अखेर आणखी किती कर्ज काढावयाचे असा विचार करून आणि सावकार लोकांचे धमकीचे फोन आल्याने वैतागलेल्या अमोल जगताप याने 13 जुलै रोजी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास पत्नी मयुरी अमोल जगताप (वय 27) हिचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून, तर मुलगा आदित्य (वय 6) व लहान मुलगा आयुष (वय 4) या दोघांचा साडीने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः त्याच घरातील छताच्या हुकास साडीच्या सहाय्याने गळफास लावून अमोल जगताप याने आत्महत्या केली.
अशा आशयाची फिर्याद मृत अमोल जगताप यांचे बंधू राहुल अशोक जगताप यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल केली. मृत अमोल अशेाक जगताप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्याकडे असताना त्यांनी खासगी सावकार व्यंकटेश पंपण्णा डंबलदिनी याच्याकडून 70 लाख रूपये घेतले होते. त्यामुळे पो.नि. साळुंखे यांनी सावकार व्यंकटेश डंबलदिनी याला अटक केली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास शहर गुन्हे शाखेकडे गेला.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्यात वारद चाळीत राहणारा सिध्दाराम उर्फ सिध्दू बिराजदार याला व त्याचा भाच्चा दिनेशकुमार बिराजदार या दोघांना अटक केली. यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात नगरसेवक लक्ष्मण जाधव याला धुळखेड येथे, तर दशरथ कसबे याला सोलापुरात अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज