टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना राज्य शासनाने 15 जून पासून शाळा सुरु करण्याचा हट्ट धरला आहे. या हट्टापायी शासनाने विद्यार्थी, शिक्षक यांचा जीव धोक्यात घालू नये, असे म्हणत शिक्षक क्रांती संघटनेसह इतर संघटनांनी शाळा लवकर सुरु करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रसार होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा, महाविद्यालये मार्च महिन्यापासून बंदच ठेवण्यात आली आहेत. मुंबईत एका शाळेतील विद्यार्थ्याला करोनाची लागण झाल्याने शासनाने डोळे उघडले होते. त्यानंतर दहावीच्या भूगोलाच्या पेपरची परीक्षा रद्द करण्यात आली होती.
शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिरसाट यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना निवेदनही पाठविले आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे सचिव प्रा.संतोष फाजगे, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांनीही शाळा व कनिष्ठ महाविद्यालये लवकर सुरु करण्याचा विरोध दर्शविला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज