डॉ.उर्मिला पाटील/डॉ.अभिजित पाटील
कोरोना येऊन किती दिवस झाले, रोज सकाळ पासून रात्री झोपेपर्यंत सर्वजण मेडिया, पेपर , टीव्ही इत्यादी प्रसार माध्यमातून त्याबाबत माहिती पाहत असतात तरीही या काळामध्ये आपण कसे वागले पाहिजे याबाबत समाजामध्ये जागरुकता दिसत नाही, मागील दोन दिवसांमध्ये आलेला कटू अनुभव आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत,02/06/2020 रोजी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास एक पेशंट आले, त्याला अंग दुखत आहे असे त्याने सांगितले,
डॉक्टर या नात्याने त्याला तपासून त्याची रक्ताची चाचणी केली, त्यामध्ये त्याची welfelix टेस्ट म्हणजेच गोचीड ताप पॉजीटीव्ह आली…. त्याला गोळया लिहून दिल्या पण मला सलाइन शिवाय नाही बरे वाटणार असे म्हणाला… त्यामुळे त्याला सलाइन लावली..आणि त्याला घरी पाठवले… नंतर सकाळी तो दाखवायला आला असता त्याच्या पेशी कमी असल्याने त्याला ट्रीटमेंट चालू केली.
10.वाजता… 10.30.वाजता पोलीस आणि प्रशासनाची लोक आले… नंतर समजले पेशंट बाहेर गावी जाऊन आले होते… त्याने हे आमच्यापासून लपवून ठेवले… असे लपवणे किती धोकादायक आहे त्याची कल्पना नसावी त्याला… तो एका पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आला होता… माझी सर्व डॉक्टर्स सहकाऱ्यांच्या वतीने समाजाला विनंती आहे.. माहिती लपवू नका.. यामुळे तुमचे कुटुंब धोक्यात येईल आणि विनाकारण आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या जीवाशी खेळतोय हे लक्षात घ्या.
आता दुसरी बाजू…. हे झालं जे घडलं ते.. पण आपल्या आजूबाजूला अशी माणसं असतात कि त्यांना बाहेर काय चाललंय आणि आपण काय करतोय याचे भानच नसते… अशा कठीण प्रसंगी आपण नागरिक म्हणून काय केले पाहिजे हे त्यांना माहीतच नसतं… कोणी त्या पेशंट चा व्हिडीओ काढून सोशिअल मीडिया वरती लगेच टाकून रिकामे.. अशा वेळी रुग्ण, प्रशासन, डॉक्टर्स, कंपाऊंडर, सिस्टर्स अशा लोकांना मदत करता येते का हे करण्यापेक्षा त्यांना विडिओ टाकण्यात आनंद वाटतो … .. हॉस्पिटल चे फोटो, विडिओ तयार करायचे… आपल्याला काहीही माहित नसताना अफवा पसरवणे ही काम अशी मंडळी सहज करतात.
अफवा तर अशा असतात कि आपल्याला आपल्याच बद्दल काही माहित नाही असं वाटत…. पेशंट चा रिपोर्ट यायच्या आधी तो पॉजिटीव्ह आहे असं पसरवतात… पण याचा परिणाम काय होईल याच त्यांना काही घेणे देणे नसते… दुसरी गोष्ट म्हणजे हॉस्पिटल मध्ये काम करणारे कंपौंडर, सिस्टर्स यांच्या घरच्यांना उगीच घाबरवणे, त्यांना वाळीत टाकणे अशी काम केली जातात… जे त्यांच्या जीवाची पर्वा न करता रूग्णसेवा करतात त्यांना समाज असे वागवताना पाहिले कि खरंच खूप वाईट वाटते…. .
कहर म्हणजे रुग्ण एक तास असताना चार दिवस ऍडमिट असल्याची अफ़वा, एक तिथे दोन रुग्ण असल्याची अफ़वा, शिवाय जे रुग्ण आधी येऊन गेले, ज्यांचा या रुग्णाशी काहीही संपर्क नसताना त्यांना घाबरवणे असे खूप घडते.
तरी आपण सर्वांनी काळजी घ्या,सुरक्षित राहा, अफवांना बळी पडू नका, कोणी रुग्ण आढळून आल्यास त्याचा मीडिया वर प्रसार करू नका, प्रशासन, पोलीस, डॉक्टर्स, नर्स, कंपाऊंडर, रुग्ण व त्याचे नातेवाईक यांना धीर द्या व मदत करा….या कठीण प्रसंगी कोणाचे मनोबल कमी होईल असे काही करू नका .. लक्षात ठेवा ही वेळ कधी आणि कोणावर येईल हे सांगता येत नाही कदाचित उद्या आपला नंबर असू शकतो…..सुदैवाने तो रुग्ण निगेटिव्ह आला आणि काळजी मिटली. …. काही लोकांनी, नातेवाईक यांनी वेळोवेळी मदतही केली. सहकारी, प्रशासन, पोलीस यांचे सर्वांचे मनापासून आभार.
डॉ.अभिजित पाटील आणि डॉ.उर्मिला पाटील. शिवम हॉस्पिटल वेळापूर.
Corona, rumors and society

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज