मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशामध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, कोरोना विषाणूला रोखण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. कोरोना विषाणूचा अकरावा बळी गेला आहे. मदुराई येथील राजाजी रुग्णालयात एका 54 वर्षीय नागरिकाचा कोरोना विषाणूमुळे बुधवारी पहाटे मृत्यू झाला आहे.
संबधित व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अती तणाव असे आजारही होते. तामिळनाडू राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. सी. विजयशंकर यांनी ही माहिती दिली. तामिळनाडूमध्ये 18 कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. त्यापैकीच एकाचा आज मृत्यू झाला.
देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून 536 वर आकडा पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांसाठी देश लॉकडाऊन केला आहे. या आपात्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक वस्तूंचा पूरवठा सुरूच राहणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज