टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोना विषाणू संसर्गामुळे मनात निर्माण झालेली भीती, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी, तेथे बेड मिळण्यासाठी करावी लागणारी धडपड, त्यानंतर औषधी, इंजेक्शन मिळविण्यासाठी मेडिकल स्टोअर्सचे उंबरठे झिजविण्याची आलेली वेळ,
एवढा धावपळीने त्रस्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटल सरकारी दरापेक्षा जास्त बिल वसूल करीत असल्याचे उघड झाले आहे.
करोनाग्रस्तांकडून तब्बल हजारो लाखो रुपये जादा बिल घेतले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने २१ मे २०२० व ३१ ऑगस्ट २०२०च्या अधिसूचनांनुसार राज्य शासनाने करोनाग्रस्त रुग्णावर उपचार करताना आकाराणी करण्यात येणारे दर निश्चित केलेले आहेत.
यामध्ये हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या शुल्काचाही समावेश आहे. त्यानुसार करोनाग्स्त रुग्णांकडून जादा दराने आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहे,
मात्र मंगळवेढा शहरातील अनेक हॉस्पिटल रुग्णांकडून जादा दराने बिल आकारणी करतात, अशा अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.
याची गंभीर दखल घेऊन हॉस्पिटलकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांची तपासणी करण्यासाठी समिती नेमावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
(भाग 1)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज