टीम मंगळवेढा टाईम्स । पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.29) दिवसभरात एकूण 2 हजार 453 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरातील एकूण नवीन कोरोना रुग्णांपेक्षा दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.
यामुळे पुणेकरांसाठी थोडासा दिलासादायक बातमी आहे. आज 3 हजार 748 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील 1 हजार40 जण आहेत. याशिवाय गेल्या चोवीस तासांत 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 684, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 557, नगरपालिका क्षेत्रात 139 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 33 नवे रुग्ण सापडले आहेत.
मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 40 रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 16, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 22, नगरपालिका क्षेत्रातील 8 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही काल (ता.28) रात्री 9 वाजल्यापासून आज (ता.29) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.
कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 548, पिंपरी चिंचवडमधील 806, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 1 हजार 89, नगरपालिका क्षेत्रातील 274 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 31 जण आहेत.
मागील साडेसहा महिन्यांपासून आजतागायत जिल्ह्यातील एकूण 6 हजार 446 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक 3 हजार 595, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 306, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 1 हजार 10, नगरपालिका क्षेत्रातील 361 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 174 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 258 रुग्ण आहेत.
Corona’s consolation to Pune residents! Recovery rate higher for third day in a row

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज