mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बाप रे…! सोलापूर ग्रामीणमध्ये मंगळवारी पुन्हा कोरोनाचे 7 बळी; 207 कोरोनाबाधित आढळले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
बाप रे…! सोलापूर ग्रामीणमध्ये मंगळवारी पुन्हा कोरोनाचे 7 बळी; 207 कोरोनाबाधित आढळले

टीम मंगळवेढा टाइम्स । सोलापूर शहराला मंगळवारी दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र रुग्ण वाढीचे सत्र सुरूच आहे मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात 207 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बाधितांची संख्या 4 हजार 301 झाली आहे.  solapur rural corona news update


मंगळवारी कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 127 एवढी झाली आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. ऍन्टिजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात घेतल्या जात असल्यामुळे ही संख्या वाढलेली दिसत आहे.

मंगळवारी पंढरपूर येथील 53 वर्षीय पुरुष, नान्नज (ता.उत्तर सोलापूर) येथील 45 वर्षाची महिला, वैराग येथील 63 वर्षाची महिला, बार्शी येथील 68 वर्षीय पुरुष,कुर्डू (ता.माढा) येथील 67 वर्षीय पुरुष, चपळगाव (ता.अक्कलकोट) येथील 65 वर्षीय महिला व आढीव (ता.पंढरपूर) येथील 57 वर्षीय पुरुषाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.


सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावांमध्ये आढळले नवे रुग्ण


मंगळवेढ्यातील शनिवारपेठ, डोंगरगाव, लक्ष्मी दहिवडी येथे प्रत्येकी एक, मरवडे येथे सात रुग्ण आढळले. पंढरपुरातील अनिल नगर येथे चार, घोंगडे गल्ली, गोविंदपुरा येथे प्रत्येकी एक, इसबावी येथे दोन, मनीषा नगरात चार, विवेकवर्धिनी शाळेजवळ एक, संभाजी चौक येथे दोन, आंबे येथे एक, भोसे येथे आठ, कासेगाव येथे सात, शिरगाव येथे तीन रुग्ण आढळले. सांगोल्यातील परीट गल्ली, आलेगाव येथे प्रत्येकी एक, महूद येथे तीन, नाझरे येथे एक रुग्ण आढळला.

अक्कलकोट येथील ए-वन चौक, स्वामी विवेकानंद पार्क प्रत्येकी दोन, चपळगाव, चुंगी प्रत्येकी चार, काझीकणबस, किणी प्रत्येकी पाच, तडवळ येथे एक रुग्ण आढळला. करमाळ्यातील बागवान नगर, कृष्णाजीनगर येथे प्रत्येकी एक, सिद्धार्थनगर, देवीचा माळ येथे प्रत्येकी दोन रुग्ण आढलले. माढ्यातील भांगे गल्लीत तीन, संत सेनानगरात पाच, शिवाजी नगर येथे तीन, अकोलेबुद्रुक येथे एक, मोडनिंब येथे आठ, निमगाव टे, रांझणी येथे प्रत्येकी एक, उपळाई बुद्रुक येथे 23 रुग्ण आढळले. माळशिरस तालुक्‍यात अकलूज येथे तीन, दहिगाव, खंडाळी, माळीनगर येथे प्रत्येकी एक, नातेपुते, सवतगाव येथे प्रत्येकी तीन, वेळापूर, विझोरी प्रत्येकी एक रुग्ण आढळले.

मोहोळ तालुक्‍यातील औंढी, हराळवाडी, कामती बुद्रुक, कामती खुर्द येथे प्रत्येकी एक, कोरवली येथे आठ, पापरी, पाटकूल, विरवडे येथे प्रत्येकी एक, वडवळ येथे नऊ, वाघोलीवाडी येथे दोन रुग्ण आढळले.


उत्तर सोलापूर तालुक्‍यात वडाळा येथे सहा, कळमण येथे दोन रुग्ण आढळले. बार्शी येथील आडवा रस्ता, भिसे प्लॉट, कसबा पेठ येथे प्रत्येकी एक, अलिपूर येथे दोन, लहूजी चौक, पंकज नगर येथे प्रत्येकी तीन, पाटील चाळ, सोलापूर रोड, सुभाषनगर, उपळाई रोड येथे प्रत्येकी एक, वाणी प्लॉट येथे दोन, आगळगाव येथे एक, भोयरे येथे पाच, रातंजन येथे दोन, उंबरगे येथे एक, उपळे दु येथे दोन, वैराग येथे चार रुग्ण आढळले. दक्षिण सोलापूर तालुक्‍यात औराद, मंद्रूप येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
पाऊस समाधानकारक झाल्याने एकरी टनेज वाढणार : चेअरमन समाधान आवताडे

पाऊस समाधानकारक झाल्याने एकरी टनेज वाढणार : चेअरमन समाधान आवताडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 10, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

February 9, 2026
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

February 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा