मंगळवेढा । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागातील आज मंगळवारी आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यात 14 रूग्ण पॉझिटीव्ह आले असून यामुळे आता रूग्णांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढ काही केल्या थांबेना झाली आहे. आज पुन्हा 14 नव्या रुग्णांची भर पडली असून त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 490 वर गेली आहे.
आज दि.1 सप्टेंबर रोजी 79 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 64 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 64 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केलेल्या सर्व नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह -11 निगेटिव्ह -53 आलेले आहेत. सदर नागरीक हे मंगळवेढा 2 , दामाजी नगर 6 , चोखामेळानगर 1 , सिध्दापुर 2 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे आज 03 नागरीकांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. सदरनागरिक हे मंगळवेढा शहर 2 , बोराळे 1 , येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 490 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 330 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 150 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
The number of corona victims in Mangalwedha taluka is on the threshold of five hundred; Infected 14 people today
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत. आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज