समाधान फुगारे । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचे आज 15 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे कोरोना ग्रस्तांच्या आकेडवारीने डबल सेंच्यूरी पार केली आहे. एकूण रुग्णांची संख्या 207 झाली आहे
आज दि.9 ऑगस्ट रोजी 4 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेण्यात आलेले आहेत.
तसेच आज 143 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 143 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 137 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. सदर नागरीक हे मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत तळसंगी येथील 6 रुग्ण आहेत.
तसेच सांगोला येथील तपासणी मध्ये लक्ष्मीदहीवडी ता.मंगळवेढा 1 अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.त्यामुळे रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी 7 अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत स्वब ( RT – PCR ) चे 8 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण आंधळगांव येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 207
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 99 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 106 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
The number of Corona victims in Mangalwedha taluka has crossed 200
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज