टीम मंगळवेढा टाईम्स ।
मागील दोन आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यास पुरेशा प्रमाणात कोविड लस उपलब्ध होत असून शुक्रवारी दोन लाख डोस प्राप्त झाले आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे यांनी आज शनिवारी एकाच दिवसात ही लस संपेल असे लसीकरणाचे नियोजन केले आहे.
त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना लसीकरणाचे काम व्यवस्थितरीत्या पार काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
निकषाप्रमाणे दिलेली लस त्वरित संपवल्यामुळे सोलापूर जिल्ह्यास आज दोन लाख डोस मिळाले आहेत. यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातून कुपनची व्यवस्था राबवल्यामुळे लसीकरणाच्या कामात सुसूत्रता आली आहे.
आज शनिवारी संपूर्ण जिल्हाभर वॉक इन व्हॅक्सीनेशन मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील अद्याप लसीकरण न झालेल्या नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी असे आवाहन यावेळी सीईओ स्वामी यांनी केले आहे.
कोविडच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. तरी नागरीकांनी उद्याच्या मेगा लसीकरण मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे डॉ शितलकुमार जाधव यांनी सांगितले. या मेगा लसीकरण मोहिमेच्या नियोजनावर मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज