mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटलांसह 12 जणांवर गुन्हा दाखल; जमावबंदी आदेशाचं उल्लंघन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 11, 2021
in सोलापूर, क्राईम
काँग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर; धवलसिंह मोहिते-पाटीलांना मोठी जबाबदारी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  धवलसिंह मोहिते पाटील यांनी काल सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश असताना गर्दी करुन नियमभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर आयुक्तालयाच्या जेल रोड पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भांदवि 143, 188, 269, 336 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (बी) सह भारतीय साथरोग अधिनियम 1897 चे कलम 3 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 प्रमाणे धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह 12 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एकमेकांच्या पायात पाय घालणं बंद करावं : माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे

दरम्यान धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पदग्रहण सोहळ्यावेळी माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. व्यासपीठावर बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या पायात पाय घालणं बंद करावं.

जिल्ह्यात काँग्रेस संघटना वाढवण्याची जबाबदारी एकट्या धवलसिंह मोहिते-पाटील यांची नाही तर सर्व पदाधिकाऱ्यांची आहे. मात्र, व्यासपीठावर बसलेले पदाधिकारी एकमेंकात पाय घालत बसतात.

पायांना कुठेतरी बांधून ठेवा तरच काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहिल, असं सिद्धराम म्हेत्रे म्हणाले. पदाधिकाऱ्यांचं राजकारण होईल, वादामुळे थोडंफार समाधान होईल मात्र त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल.

धवलसिंह मोहिते पाटील यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या पदग्रहण सहोळ्यावेळी सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सुनावलं.

काँग्रेसकडून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपती नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवेसना असा प्रवास करुन पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेले धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदापासून ते केंद्रीय गृहमंत्रीपदी राहिलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत राखण्यात यश आलं नाही, अशी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची खंत आहे. या पार्श्वभूमीवर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे.

सध्याच्या काळात काँग्रेसची वैचारिक परंपरा लयाला जात आहे. एकेकाळी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. पण आता ती राहिली आहे का माहिती नाही, अशी खंत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली होती.

जूनमध्ये इंदापुरात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रम पार पडला. त्यावेळी शिंदे यांनी ही खंत बोलून दाखवली होती.

यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते. दरम्यान सुशीलकुमार यांनी पक्षाच्या सद्यस्थितीविषयी खंत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गुन्हा दाखलधवलसिंह मोहिते पाटील

संबंधित बातम्या

गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

भयानक! वडिलांचे सहामहिन्यांपूर्वी निधन, जमीन नाही, स्वतःचे हक्काचे घर नव्हते, हलाखीच्या परिस्थितीमुळे मानसिक तणावाखाली १४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

July 12, 2025
बापाचे पाऊल वाकडे पडले,मुलाने त्याला यमसदनी धाडले; बेकरी चालकाच्या हत्येचे गूढ उकलले

धक्कादायक! मुलीच्या कमाईवर जगत असल्याच्या टोमण्यांमुळे वडिलांकडून मुलीची हत्या

July 12, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! खोट्या सोन्यावर तारण कर्ज घेण्याची मंगळवेढ्यासह तीन तालुक्यात साखळी, साेलापूर जिल्हा बँकेतील प्रकार, अनेकांवर होणार गुन्हे दाखल; ‘इतके’ शाखाधिकारी निलंबित

July 12, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

तीन सहकारी बँकांना आरबीआयकडून विविध कारणासाठी दंड; सोलापूर आणि…’या’ बँकेचा समावेश

July 11, 2025
पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

आमदार अभिजीत पाटलांच्या विठ्ठल कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी 10 लाखांची खंडणी; सामाजिक कार्यकर्त्याला अटक

July 11, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

भक्षक! जुगाराचा नाद लागला, कायद्याच्या रक्षकानेच कायदा मोडला; पोलीस थेट चोर बनला

July 11, 2025
अवघे गरजे पंढरपूर..! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा; विठ्ठलाच्या चरणी देवेंद्र फडणवीसांनी घातलं ‘हे’ महत्वपूर्ण साकडं

यंदाच्या आषाढी वारीने मोडले सर्व विक्रम, पंढरीत किती भाविकांची गर्दी? AI च्या सहाय्याने केली मोजणी; ‘एवढे’ लाख भाविकांचा हेड काउंटची नोंद

July 8, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

नवऱ्याचं डोकं सटकलं! दोन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोचा चार्जरच्या वायरनं गळा घोटला; नंतर स्वत:लाही संपवलं; सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना

July 8, 2025
Next Post
पोलीस ठाण्यांना सूचना! मंडपात जाऊन दर्शन घ्याल तर कारवाई; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पोलीस ठाण्यांना सूचना! मंडपात जाऊन दर्शन घ्याल तर कारवाई; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ताज्या बातम्या

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य राखीव पोलिस दलात आता महिलांना संधी मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नियमित पदे निर्माण करण्यास दिली मान्यता

July 13, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता सातबाराची गरज भासणार नाही ; फक्त ‘हा’ क्रमांक असणार बंधनकारक

July 13, 2025
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार; नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून यांची लागणार वर्णी?

July 12, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

भयानक! वडिलांचे सहामहिन्यांपूर्वी निधन, जमीन नाही, स्वतःचे हक्काचे घर नव्हते, हलाखीच्या परिस्थितीमुळे मानसिक तणावाखाली १४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

July 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा