mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संतापजनक : कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू,कोव्हिडं हॉस्पिटलचे केवळ कागदोपत्री हस्तांतरण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
संतापजनक : कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू,कोव्हिडं हॉस्पिटलचे केवळ कागदोपत्री हस्तांतरण



टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात दररोज कोरोना रुग्णांची झपाट्याने संख्या वाढत आहे ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत त्यांच्यावर मंगळवेढा येथील कोव्हिडं केअर सेंटर येथे उपचार होत आहेत परंतु ज्यांची लक्षणे तीव्र स्वरूपात असतात ज्यांना श्वसनाचा त्रास होतो अशा रुग्णांचे मात्र हाल होत आहेत प्रसंगी जीवही गमवावा लागू नये यासाठी मंगळवेढा येथे अत्याधुनिक कोव्हिडं हॉस्पिटल उभारावे अशी मागणी होत आहे.


मंगळवेढा तालुक्‍यातील गणेशवाडी येथील एका 40 वर्षीत व्यक्तीला त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवेढा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्‍टरांनी त्यांना सोलापूर येथे उपचाराला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. परंतु बराच वेळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे संबंधित व्यक्तीला खासगी वाहनाने उपचारासाठी सोलापूरला नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तालुक्‍यात आरोग्य व्यवस्था कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान जिल्हा प्रशासनाने मंगळवेढा येथील   दोन हॉस्पिटलचे कोव्हिडं हॉस्पिटल म्हणून  हस्तांतरण केले आहे.मात्र तेथे चार महिने होत आले तरी अद्याप उपचार सुरू न झाल्याने  श्वसनाचा व इतर त्रास असणाऱ्या रुग्णाची उपचाराअभावी तडफड सुरू आहे. 

त्यामुळे मंगळवेढा येथे उपचारासाठी परवानगी दिलेल्या कोव्हिडं हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू करून रुग्णांचा जीव वाचवावा करावी अशी मागणी होत आहे.

पाहिजेत


मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या मेडिकल स्टोअरसाठी बी’ किंव्हा ‘डी’ फार्मसी झालेल्या अनुभवी मुला मुलींची अर्जंट भरती होणार आहे. संपर्क : 7322020202

आजपर्यंत तब्बल 14 जण कोरोनाने मृत्युमुखी पडले असून आणखी किती बळी गेल्यानंतर कोव्हिडं हॉस्पिटल सुरू होणार असा संतापजनक सवाल केला जात आहे.मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात कोरोना चाचणी प्रमाण वाढल्याने परिणामी रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

सध्या गावोगावी रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू केल्या आहेत त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत आहे दरदिवशी दोन अंकी संख्येत पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत. ज्या रुग्णांना सौम्य लक्षण आहेत त्यांना वीरशैव येथील कोव्हिडं केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहेत.


मात्र येथील सोयीसुविधा बाबत जनतेतून कायमच ओरड ऐकावयास मिळत आहे.रुग्ण कोव्हिडं सेंटर मधून निगेटिव्ह म्हणून बाहेर पडल्यानंतर तेथिल एकूण चित्र मांडतो. ते ऐकुन तेथे आपल्याला जावे लागू नये असे सर्वानाच वाटते. शहरातील रुक्मिणी माता कोव्हिडं केअर सेंटर मध्ये सहा ऑक्सिजन यंत्रे बसवण्यात आली आहेत मात्र रोजची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पाहता उपाययोजना तोकडी पडत असल्याच्या प्रतिक्रिया रुग्णांमधून व्यक्त होत आहेत. 

अनेक वयस्कर रुग्ण आढळत आहेत त्यांना श्वसनाच्या त्रासाबरोबर इतर आजारही असल्याने अशा रुग्णाची मंगळवेढा येथे अत्याधुनिक सुविधा अभावी गैरसोय होत आहे.सोलापूर ला जावे तर तेथे बेड मिळत नाहीत.

मंगळवेढा येथे रुग्णाची सोय व्हावी यासाठी  दोन सुसज्ज हॉस्पिटल कोव्हिडं हॉस्पिटल म्हणून जाहीर केली आहेत मात्र येथे कोव्हिडं रुग्णांवर उपचार सुरू नाहीत. या दोन हॉस्पिटलप्रमाणे शहरातील महात्मा फुले योजनेत समावेश आसलेल्या दामाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही कोव्हिडं उपचार सुरू झाल्यास रुग्णांची हेळसांड थांबेल. या हॉस्पिटल शिवाय शहरात जी सुसज्ज हॉस्पिटल जिल्हा प्रशासनाने कोरोना महामारीच्या काळात हस्तांतरित करून घेण्याची गरज आहे.


आज सोलापूर शहरात बेड उपलब्ध व्हावा यासाठी अनेकजण हातापाया पडत आहेत तरीही वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत गत आठवड्यात मंगळवेढा येथिल दोन नामांकित डॉक्टरांना सोलापूर येथील उपचारासाठी बेड मिळावा यासाठी किती तरी वेळ वाट पहावी लागली डॉक्टरांची ही अवस्था असेल सर्वसामान्यांची अवस्था काय असेल हे विदारक वास्तव समोर आले आहे.

केवळ अत्याधुनिक कोव्हिडं हॉस्पिटल नसल्याने जर मंगळवेढ्यातील रुग्णांना जीव गमवावा लागत असेल तर हे योग्य नाही. त्यामुळे या विषयाकडे लोकप्रतिनिधिसह  तालुक्यातील सर्व नेतेमंडळीनी गंभीरपणे पाहून लवकरात लवकर अत्याधुनिक कोव्हिडं हॉस्पिटल निर्मिती करावी अशी मागणी होत आहे. 

मंगळवेढा येथील ही दोन हॉस्पिटल कोव्हीड हॉस्पिटल म्हणून जिल्हा प्रशासनाने हस्तांतरण केले आहेत मात्र अद्याप उपचार सुरू नाहीत . शहरातील रुक्मिणी माता कोव्हीड केअर सेंटर मध्ये सहा ऑक्सिजन यंत्रे बसवण्यात आली आहेत.- स्वप्निल रावडे,तहसीलदार मंगळवेढा

मंगळवेढा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आजपर्यंत 14 जण मृत्युमुखी पडले आहेत.अशा स्थितीत शहरात अत्याधुनिक कोव्हीड हॉस्पिटलची गरज आहे.अनेकांना सोलापूर येथे बेड उपलब्ध न झाल्याने तडफड सहन करावी लागत आहे.आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन हॉस्पिटल सुरू करणार आहे. तालुक्याला कोणी वाली नसल्याने मंगळवेढा तालुक्यातील रुग्णांची फरफट सुरू आहे.- धनाजी सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष बहुजन वंचित आघाडी

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
अख्ख कुटुंब कोरोनाबाधित,हॉस्पिटलच्या खर्चाच्या धास्तीने वडिलांची आत्महत्या; कोरोनाबाधित मुलाचाही मृत्यू

अख्ख कुटुंब कोरोनाबाधित,हॉस्पिटलच्या खर्चाच्या धास्तीने वडिलांची आत्महत्या; कोरोनाबाधित मुलाचाही मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा