टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलीस कर्मचारी देखील कोरोनाचे बळी ठरत ( Solapur Police Death due to Corona) आहेत.
सोलापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे आणखी एका पोलीसाचा मृत्यू झाला आहे. ते बिनतारी संदेश विभागात कार्यरत (Solapur Police Death due to Corona) होते.
दरम्यान याआधी पंढरपूर येथील पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, शौकतअली मोहिद्दीन शेख (वय ५७) असे मृत्यू झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. मयत शेख हे सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील बिनतारी संदेश विभागात कार्यरत होते.
दिवसेंदिवस पोलीस दलातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत 2 हजारा पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे राज्यात पोलिसांचा मृत्यू झाला आहे. समावेश आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा केली होती.
Corona kills Sub-Inspector of Police in Solapur Rural Police
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज