mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

काळजी घ्या! समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
काळजी घ्या! समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका

 

टीम मंगळवेढा टाईम्स । वाढत्या कोरोनाच्या प्रसारात कोरोनाची नवीन लक्षणं समोर यायला सुरूवात झाली आहे. संक्रमित झालेल्या अनेकांना सर्दी, खोकल्या व्यक्तीरिक्त अनेक लक्षणांचा सामना करावा लागत आहे. फक्त श्वसनसंस्थाच नाही तर शरीराच्या अनेक भागांवर कोरोना संक्रमणाचा परिणाम दिसून येत आहे.

आज आम्ही तुम्हाला या लक्षणांबाबत सांगणार आहोत. ताप, कफ, श्वास घ्यायला त्रास होणं याव्यतिरिक्त आणखीही काही लक्षणं आहेत. याबाबत अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे.

प्रामुख्याने लक्षणं नसलेल्या रुग्णांनी अधिक सतर्कता बाळगायला हवी. ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) संस्थेतर्फे दिशा निर्देश जारी करण्यात आले आहे. यात कोरोना संक्रमित व्यक्तीच्या चार लक्षणांबाबात सांगण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर ही लक्षणं २ ते ४ दिवसांमध्ये दिसून येतात. NHS च्या एडवायजरीनुसार ही लक्षणं एक दिवस किंवा एका दिवसापेक्षा जास्त तर अनेकदा संक्रमण पूर्ण कमी होईपर्यंत दिसू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

डोळ्यांची समस्या

या एडवायजरीनुसार डोळे लाल होणं, डोळ्यांना सुज येणं ही कोरोना संक्रमणाची लक्षणं आहेत. याप्रकारात डोळ्यातून पाणी बाहेर येते, कधी डोळे लाल होतात, तर कधी सूज येते. तज्ज्ञांच्या मते ही लक्षणं सामान्य असली तरी गंभीर संक्रमण झाल्यास ही लक्षणं दिसून येतात.

बेशुद्ध होणं


कोरोना संक्रमणामुळे मानसिक समस्यांचाही सामना करावा लागतो. त्यामुळे डोक्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. ही लक्षणं कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांमध्ये पाहायला मिळतात. NHS नं दिलेल्या माहितीनुसार डोकेदुखी, थकवा येणं यासोबत अस्वस्थ वाटणं, बेशुद्ध होणं ही स्थितीही उद्भवू शकते.

सतत खोकला येणं

सुका खोकला येण्याची वेगवेगळी कारणं आहेत. सतत खोकला येत असेल तर व्हायरसच्या संक्रमणाचं कारण असू शकतं. UK च्या एका सर्वेमध्ये दिसून आलं की कोरोनामुळे संक्रमित असलेल्या एका रुग्णाला जवळपास चार तासांपर्यंत खोकला येण्याची समस्या उद्भवली होती.

त्वचेच्या रंगात बदल होणं

कोरोनाचं संक्रमण झाल्यास त्वचेवर सुज येते अनेकदा चट्टे पडतात. त्वचेच्या रंगात बदल होणं हे कोरोना संक्रमणाचं लक्षण असू शकतं. अशी लक्षणं तरूणांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. काहीवेळा पायांना जखम झाल्याप्रमाणे लक्षणंही दिसतात.


काय करायला हवं

अशी लक्षणं दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. सुरूवातीची लक्षणं दिसत असल्यास स्वतःला होम क्वारंटाईन करून घ्या. मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंग आणि सगळ्यात महत्वाचं वैयक्तिक स्वच्छेची काळजी घ्यायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका. लवकरात लवकर चाचणी केल्यास योग्यवेळी उपचार करता येऊ शकतात.

फ्लू आणि कोविड १९ एकत्र


उद्भवल्यास मृत्यूचा धोका दुप्पट

‘पब्लिक हेल्थ इंग्लँड’ (PHE) च्या रिपोर्टनुसार या दोन्ही इन्फेक्शनमुळे मृत्यूचा धोका दुप्पटीने वाढतो. याशिवाय तज्ज्ञांनी हिवाळ्यात या आजारांचा धोका वाढणार असल्याची सुचना देण्यात आली होती. 

या रिपोर्टनुसार दोन्ही इन्फेकशन्स एकाचवेळी उद्भवल्यास रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाला निरोगी रुग्णाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी धोका जास्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. ब्रिटनमध्ये याचवर्षी सगळ्यात मोठं लसीकरण केलं जाणार आहे. ‘द गार्डियन’ ने यासंदर्भातील माहिती दिली होती.

एखाद्या व्यक्तीला फ्लू आहे की कोरोनाचं संक्रमण याची काळजी घ्यावी लागेल. PHE च्या रिपोर्टनुसार देशात २० जानेवारी ते २५ एप्रिल या कालावधीत एकूण २० हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 

अनेकांना रुग्णाला फ्लू आणि कोरोना व्हायरस या दोन्ही समस्या उद्भवल्या होत्या. यातील जास्तीत जास्त रुग्णांची स्थिती गंभीर होती. ४३ टक्के लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला होता. दरम्यान कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्याचं प्रमाण २७ टक्के होतं.

फ्लू एक व्हायरल इन्फेक्शन आहे. जे खोकण्यातून किंवा शिंकण्यातून पसरतं. कोविड १९ सुद्धा असाच पसरतो. फ्लूने संक्रमित असलेला व्यक्ती जवळपास एका आठवड्यानंतर बरा होतो. पण कोविड १९ असलेल्या व्यक्तीला या आजारातून बाहेर येण्यासाठी जास्तवेळ लागू शकतो.

दरम्यान या दोन्ही आजारांमुळे ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांच्या जीवाला धोका असतो. हिवाळ्याच्या वातावरण फ्लू जास्त पसरतो. कोरोनाबाबत सांगता येणं कठीण आहे. पण दोन्ही आजारांची लक्षणं सारखीच आहेत. वैद्यकिय तपासणी केल्याशिवाय यातील फरक ओळखणं कठीण आहे.(Lokmat)

3 new symptoms of corona appeared;  Ignoring it can increase the risk of infection

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
शेतकऱ्यांनो! हरभऱ्याचा ‘फुले विक्रम’ वाणाची बियाणे आता मंगळवेढ्यात मिळणार

शेतकऱ्यांनो! हरभऱ्याचा ‘फुले विक्रम’ वाणाची बियाणे आता मंगळवेढ्यात मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा