टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सर्व दुध उत्पादक व दुध संकलन संस्थाचालकांसमवेत मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची
आज बुधवार दिनांक २६ जून २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मंगळवेढा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठकीमध्ये दूध उत्पादक व दूध संकलन संस्थाचालकांच्या विविध अडी-अडचणी, दुध दर व इतर विविध विषयांवर आमदार आवताडे हे संवाद साधणार आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकरी व दूध उत्पादक पशुपालकांचे दूध व्यवसाय हे दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रमुख जोडधंदा म्हणून ओळखला जातो.
त्यामुळे या व्यवसायावर आपली उपजीविका भागवणाऱ्या दोन उत्पादकांना व दूध संकलन संस्थाचालकांच्या यावेळी असणाऱ्या विविध समस्या आमदार आवताडे हे जाणून घेणार आहेत.
तरी या बैठकीसाठी तालुक्यातील सर्व दूर उत्पादक व दूध संकलन केंद्र करणाऱ्या संस्थाचालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार समाधान महादेव आवताडे जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज