टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात घसरण होत असल्याची बाब समोर आली. आवक कमी होत असतानाही दरही घसरत असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी केली आहे. त्यामुळे कांदा बाजार घसरत असल्याची टिका होत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळेही कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. कांदा उत्पादन कमी होत असताना दरही कमी होत असल्याने शेतकर्यांत मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा लिलावाकरीता राज्यात प्रसिध्द आहे. या बाजार समितीत 175 ट्रक कांद्याची आवक झाली होती.
यावेळी कांद्याला कमाल 5 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला होता. 170 ट्रक कांदा आवक झाला होता. कालच्यापेक्षा आवक कमी असतानाही यादिवशी कांद्याला कमाल 4 हजार 600 रुपयांचा दर मिळाला.
कांदा निर्यात बंंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असल्याची माहिती शेतकर्यांना बाजार समितीत देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढत असून यापुढील काळात दर कसा असणार, याबाबत शेतकर्यांतून संभ्रम व्यक्त होत आहे.
Solapur Agricultural Produce Market Committee Confusion among farmers! Onion prices fall in Solapur
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज