मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशात रक्ताची कमतरता असल्याने अनेकांचे जीव वाचवण्यासाठी मंगळवेढा येथील विविध सामाजिक संस्था मंडळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सकाळी दहा ते पाच या वेळेत श्रीराम मंगल कार्यालय येथे महारक्तदान शिबिराचे अजून केल्याची माहिती पक्षनेते जगताप यांनी दिली.
जगदंब परिवार, श्रीराम फाउंडेशन, सरकार परिवार, गौरू दादा मित्रपरिवार, खिदमत चारिटेबल ट्रस्ट, संभाजी ब्रिगेड वारी परिवार शिवजयंती उत्सव मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळ,बसवेश्वर जयंती उत्सव मंडळ, महर्षी वाल्मिक जयंती उत्सव मंडळ, संत सेना महाराज मंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमान व तहसील कार्यालय मंगळवेढा, नगरपरिषद मंगळवेढा, पोलीस स्टेशन मंगळवेढा, रेवनील ब्लड बँक सांगोला यांच्या सहकार्याने महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराचे पास मिळण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा
९०६५५७४५७३,९०२८३५८२९६,९२७३१३१३१३,९८०७११७८७८,७५८८५०४८०८,९८६०८४६८७४ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन अजित जगताप यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज