टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा परिसरातील एका चार वर्षीय अल्पवयीन मुलाला पळून नेल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला.
फिर्याद मनोज कुमार अमरसिंह साहू (वय ३१ वर्षे, रा. अकोला पो. कारेसरा ता. साजा जि. बेनेतरा, छत्तीसगड, सध्या एमआयडीसी समोर पंढरपूर बायपास रोड मंगळवेढा) यांनी दिली.
ही घटना काल दि.१८ नोव्हेंबर सायंकाळी ६ च्या सुमारास जयदीप हेंबाडे यांच्या शिवाजी पार्क येथील घर बांधकाम ते फिर्यादीच्या राहते घराच्या दरम्यान घडली.
फिर्यादी हा बांधकाम मजूर असून १८ रोजी सायंकाळी ६ वा. बांधकामाची सुट्टी झाल्यानंतर पत्नीस मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी सांगितले होते.
घरी आल्यावर मुलगा नव्हता. पत्नीला विचारल्यानंतर पत्नीने मुलाने पप्पा सोबत घरी येतो असे सांगितले. सर्वत्र शोधूनही तो सापडला नाही. तपास नासीर पठाण करीत आहेत.
मुलाचे नाव रणवीरकुमार मनोजकुमार साहू, (वय ४ वर्षे २ महिने) रंग-निमगोरा, उंची तीन फूट, चेहरा गोल, अंगात पांढरा टी-शर्ट, काळी हाफ पॅन्ट, दोन्ही पायात काळा दोरा असून तो हिंदी बोलतो.
नाक सरळ, डोळे मध्यम असून माहिती मिळाल्यास मंगळवेढा पोलीसाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसानी केले आहे.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज