मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
काशिद समुद्र किनाऱ्यात दोन व्यक्तीचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही व्यक्ती अकोला जिल्ह्यातील होते. अकोला जिल्हा प्रशासनाकडून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेने अकोल्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील एका क्लासेसचे 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक हे फिरण्याकरिता रायगड जिल्ह्यातील काशिद बीच येथे गेले होते. त्यातील 2 विद्यार्थी आणि 1 शिक्षक असे पाण्यात बुडाले असल्याचे समजतं आहे. त्यापैकी 1 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहेत. तर एक विद्यार्थी सुखरूप आहे.

राम कुटे (६०), आयुष रामटेके (१९) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोघांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी जवळील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

तर या घटनेत १७ वर्षीय आयुष बोबडे हा विद्यार्थी सुखरुप आहे. सदर घटना मुरुड पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.

मुरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केलं. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?
अकोल्यातील एका शिकवणी क्लासेस विद्यार्थी आणि शिक्षकांसह काही सहकार्यांची सहल रायगड जिल्ह्यातील काशीद बीच परिसरात फिरण्यासाठी गेली होती. काल सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास समुद्राकाठी उतरले असता समुद्राच्या लाटेत वाहून गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेत शिक्षक राम कुटे यांचा दुर्देवी मृत्यू झाला असल्याच समजते आहे.

आयुष बोबडे या 17 वर्षीय विद्यार्थीला वाचवण्यात यश आले असून तो सुखरूप आहे. तर आयुष रामटेके या 19 वर्षीय तरुणाचा देखील मृत्यू झालाय. आयुष हा शिकवणी क्लासेसचा विद्यार्थी नसून शिक्षकांच्या घराशेजारील राहणारा तरुण होता, असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, फिरण्यासाठी सोबत आलेले शिकवणी क्लासमधील केवळ तीन विद्यार्थी होते आणि तिन्ही सुखरूप असल्याचे शिकवणी क्लासेसच्या शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














