mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! अतिवृष्टीतील नुकसान पाहून शेतकऱ्यांने मृत्यूला कवटाळले; मुलाच्या वियोगाने वृद्ध पित्यानेही सोडले प्राण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 2, 2025
in राज्य
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

गेल्या आठवडाभरापासून ढगफुटी सदृश अतिवृष्टी पाऊस सुरू असून या अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला. हे नुकसान पाहून सहन न झाल्याने एका शेतकऱ्याने सोमवारी रात्री शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

दरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वृद्ध पित्याने ही घटना त्याच्या कानी पडताच अवघ्या 12 तासातच आपले प्राण सोडले.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात ही घटना घडली. निवृती कदम आणि सखाराम कदम अस पिता पुत्राचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे.

खरिपाची पिके शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली असतांनाच अचानकपणे ढगफुटी सदृश अतिवृष्टी पाऊस झाला आणि नदी-नाल्यांना प्रचंड महापूर, शेतात गुडघ्यापर्यंत पाणी, त्या पाण्याखाली खरिपाची पिके नासून उध्दवस्त झाली.

अशा बिकट परिस्थितीत संसार कसा चालायचा, बॅक आणि सावकाराचे कर्ज कसे फेडायचे ? त्यातच सततची नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा तसेच

मराठा समाजाला इतका लढा लढून प्रत्यक्षात आरक्षण कधी मिळेल या विवंचनेत असलेल्या निवृत्ती सखाराम कदम (वय 48 वर्षे) रा. कोंढा ता. अर्धापूर जि. नांदेड या शेतकऱ्यांने आपल्या शेतात जाऊन एका झाडाला गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपवली.

चिठ्ठी लिहून घेतला गळफास

मयत शेतकरी निवृती (बबन) कदम हे अतिशय मनमिळाऊ पण तेवढ्यात हळव्या मनाचे होते. वडिलांचा आजार, शेतातील नापिकी, अतिवृष्टीचे नैसर्गिक संकट यामुळे खचलेल्या निवृती कदम यांनी मृत्यू पुर्वी ‘ मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही,

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीची मदत मिळत नसून सरकारचे शेतकऱ्यांना मातीमोल करण्याचे धोरण ‘ अशी चिठ्ठी लिहून ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे वडील सखाराम कदम हे मागील अनेक वर्षांपासून अर्धांगवायू आजाराने पिडीत असून ते अंथरुणावर पडून होते.

अवघ्या 12 तासातच वडील सखाराम कदम (वय -80) यांनाही मुलाच्या घटनेची वार्ता कानी पडताच आपले प्राण सोडले. त्यांच्या पार्थिवावर आज 1 ऑक्टोबर रोजी कोंढा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अर्धापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शासनाची तुटपुंजी मदत नाकारण्याचा कर्मोडी गावचा ठराव

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी ने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने 85 रुपये प्रति गुंठा मदत जाहीर केली आहे. ही मदत अत्यंत तोकडी आणि अन्यायकारक आहे. याच्या विरोधात हदगाव तालुक्यातील करमोडी ग्रामपंचायतने थेट ठरावच घेतला.

यात शासनाची तुटपुंजी मदत नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, पिकविण्याची रक्कम देखील द्यावी, कर्जमाफी द्यावी अशी मागणी करणारे निवेदन गावकऱ्यांनी प्रशासनाला दिले आहे. या गावाला कयाधू आणि पैनगंगा या दोन्ही नद्यांचा पुराचा देखील फटका बसलेला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेतकरी आत्महत्या

संबंधित बातम्या

मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

खुर्ची तीच, फक्त नाव बदलले! ग्रामंपचायतींवर सरपंचांना प्रशासक बनवून सरकारने साधली ‘राजकीय सोय’

February 22, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात; आता तरुणाचं काय होणार? तरुणीचे धक्कादायक शपथपत्र

February 21, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिक्षणमंत्र्यांना आदेश

ताज्या बातम्या

मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

February 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा