समाधान फुगारे । 7588214814
सध्या सर्वत्र कोरोना साथरोग सुरू आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून शासनाकडून विविध अपायकारक बाबींवर निर्बध घालण्यात येत आहेत.
सर्व शासकीय यंत्रणा जाणकार नागरिक या साथरोग आटोक्यात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी दिवाळी सणाचा आनंदोत्सव शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून साजरा करावा असे आवाहन नगराध्यक्षा सौ.अरुणा माळी व मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी केले आहे.
दिपावलीच्या सणामध्ये फटाके उडवून प्रदुषण होईल, रुग्णांना त्रास होईल, अशी कृत्ये करू नयेत. आवाजी फटाके व धुर निर्माण करणा-या फटाक्यामुळे वृध्द व आजारी रुग्णाना श्वसनाचा त्रास होवून जिवितास धोका निर्माण होवू शकतो.
हा दिपावलीचा सण आपल्या आनंदोत्सवा बरोबर सर्वाना आनंदी जावा याची काळजी घ्यावी. दिव्यांची आरास करावी, दिपावली पहाट गाणी यासारखे कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने साजरे करावेत.
लक्ष्मी पुजनाच्या दिवशी दिव्यांची आरास करावी व दिपावली फटाकेमुक्त साजरी करावी. मंगळवेढा नगरपरिषदेने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून वायु गुणवत्ता तपासणी केली आहे.
त्यामळे प्रदुषण विरहित मास्क, सोशल डिस्टंन्स् व वेळोवेळी हात स्वच्छ करणे या नियमांचे पालन करून दिपावली साजरी करावी. असे आवाहन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव ,नगराध्यक्षा सौ.अरूणा माळी व सर्व नगरसेवकांनी केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज