टीम मंगळवेढा टाईम्स।
तू शाळेतील मुलांची भांडणे का सोडवली ? असे म्हणत एकाच शाळेतील दोन सहशिक्षकांमध्ये झालेल्या भांडणात एकाने दुसऱ्या शिक्षकाला शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत डोक्यात लोखंडी टेबल घालून जखमी केले.
ही घटना दि.१६ जुलै रोजी प्राथमिक आश्रम शाळा आलेगांव (ता. सांगोला) येथे घडली आहे. या घटनेची फिर्याद हणमंत रामचंद्र राऊत (वय ४५, वर्ष धंदा नोकरी (सहशिक्षक), रा.आलेगांव) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
ज्ञानेश्वर शामराव शिंदे (रा.भाळवणी, ता. मंगळवेढा) याचे विरुध्द सांगोला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे प्राथमिक आश्रम शाळा मेडशिंगी येथे सन २००८ पासून सहशिक्षक म्हणून नोकरीस आहेत. दि.१६ जुलै २०२४ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मुख्याध्यापक संजीव बाबर यांनी मुलांच्या समस्याकरिता शाळेत मिंटीग बोलवली होती.
मिटींग संपल्यानंतर फिर्यादी ऑफीसच्या बाहेर येत असताना सहशिक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी तू शाळेतील मुलांची भांडणे का सोडवली? असे म्हणून चप्पल घेवून अंगावर धावून आले होते.
त्यावेळी मुख्याध्यापकांनी भांडण सोडवले. याबाबत शाळेचे अध्यक्ष प्रकाश बाबर यांना कळवले होते. त्यावेळी त्यांनी मी पुणे येथे आहे आल्यावर पाहू असे सांगितले होते
पुन्हा दि.१८ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शाळेचे अध्यक्ष प्रकाश बाबर यांनी वरील संदर्भाने मिटींग बोलवली होती.
सदर मिंटीग चालू असताना आम्हाला झाल्या प्रकाराबाबत विचारत असताना अचानक ज्ञानेश्वर शिंदे याने मला सर्वाच्या समोर ऑफीसमध्ये गच्चीला धरले.
त्यावेळी फिर्यादी हे ऑफीसच्या बाहेर पळून आल्यावर ज्ञानेश्वर शिंदे याने ऑफीस मधील लोखंडी टेबल उचलून फिर्यादी यांच्या डोकीत घातला. त्यावेळी फिर्यादी यांच्या डोकीतून रक्त आले. त्यानंतर ज्ञानेश्वर शिंदे याने चप्पलने पाठीत मारत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजीव बाबर, अध्यक्ष प्रकाश बाबर तसेच सहशिक्षक देवीदास दिघे, दामाजी आसबे, सुनिल रणदिवे, सचिन गावडे यांनी भांडणे सोडवली असल्याचे फिर्यादीमध्ये नोंद करण्यात आले असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज