मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
वडिलांना घराचा ताबा देऊन मुलांनी घर रिकामे करावे, तसेच वडिलोपार्जित १३ एकर १७ गुंठे बागायत जमिनीत येणाऱ्या उत्पन्नापैकी ५० टक्के वार्षिक हिस्सा वडिलांना देण्याचा आदेश प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिला आहे. आई-वडिलांना सांभाळ न करणाऱ्या दोन्ही मुलांसाठी हा आदेश आहे.

सुभाष लक्ष्मण बोरगुटे (वय ७५, उपळेदुमाला ता. बार्शी) यांच्या अर्जावरून प्रांताधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे. सुभाष बुरगुटे व पत्नी शकुंतला (वय ७३) यांना जयंत, यशवंत व जयश्री अशी तीन अपत्ये असून, ही विवाहित आहेत.

सुभाष बुरगुटे व त्यांच्या पत्नीला मुले सांभाळत नाहीत, अशी तक्रार प्रांताधिकाऱ्याकडे १८ जुलै २०२५ रोजी करण्यात आली होती.

त्यामध्ये उपळे दुमाला, झाडी, पिंपरी (आर), निंबळक या गावांच्या हद्दीत १३ एकर १७ गुंठे बागायत जमीन आहे. तसेच उपळे दुमाला येथे राहते घर आहे.
या बागायत जमिनीतून २००५ पासून मुलांनी आई-वडिलांना बेदखल केले असून, जयंत व यशवंत या दोन मुलांचा ५०-५० टक्के वहिवाट हिस्सा आहे.

जयंत या मुलाने २०२० मध्ये घराबाहेर काढल्यानंतर जयवंतकडे वडील सुभाष व आई शकुंतला राहायला गेले. दोन वर्षानंतर जयवंत यानेही आई-वडिलांना सांभाळणे शक्य नसल्याचे सांगितले.
प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या आदेशात उपळेदुमाला येथील घर आई-वडिलांना देण्यात यावे व दोन्ही मुलांनी बागायत शेती उत्पन्नातील ५० टक्के वार्षिक उत्पन्न वडिलांना देण्यात यावे, असे म्हटले आहे.

लेखी म्हणणे मांडण्याची संधी..
वडिलांच्या अर्जावरून मुले जयंत व यशवंत यांना लेखी म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. जयंत यांनी आपले कसलेच म्हणणे दिले नाही.

यशवंत याने आपल्या म्हणण्यात शेतीत होणारा खर्च व मिळणाऱ्या उत्पन्नात प्रचंड तफावत आहे. शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत वारंवार नापिकी होत आहे. चालूवर्षी देखील अतिवृष्टीने नुकसान झाले असल्याचे सांगितले.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











