टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब भेट अभियान राबवत आहोत. योजनेच्या यशस्वितेसाठी, महायुतीच्या विजयासाठी शिवसैनिक घरोघरी जातील, मी आजपासून त्याची सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रात एक लाख शिवसैनिक रोज १५ घरांपर्यंत अशा पद्धतीने एक कोटी घरांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळाला की नाही, याची तपासणी करतील. लाभ मिळाला नसेल तर मार्गदर्शन करतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
लेक लाडकी लक्ष्मी’, ‘मुख्यमंत्री कार्य युवा प्रशिक्षण योजना’, ‘मुलींचे उच्च शिक्षण मोफत’, ‘शेतकऱ्यांचे वीज बील माफ’ अशा अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे म्हणून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान यशस्वी झाले. त्याचपद्धतीने कुटुंब भेट अभियान यशस्वी होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
मी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांनी या योजनांना पूर्ण पाठिंबा दिला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही सरकार म्हणून काम करतोय…
■ मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, ही श्रेयवादाची लढाई नाही.
आम्ही सरकार म्हणून काम करतोय. तिघेही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज