मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।
आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे. दोन्ही संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या असून आज रोजी पंढरपूर शहरात दाखल होतील.
आषाढी एकदशीला विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी 4 वाजता पंढरपुरात आगमन होणार आहे. मुख्यमंत्री हे सहकुटुंब उद्या पहाटे २.२० ते ४.३० या वेळेत ते शासकीय महापूजा करणार आहेत.
सध्या आषाढी वारीच्या निमित्तानं महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविक पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. दर्शनरांगेतील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 2 वाजता सोलापूरसाठी सह्याद्री अतिथीगृहावरून निघतील. त्यानंतर दुपारी 4:30 वाजता ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या जनजागृती उपक्रमाच्या समारोप सोहळ्याला उपस्थितीत राहतील.
आज 5 वाजता सोलापूर वन विभागानं तयार केलेल्या काॅफिटल बुकचं अनावरण आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पंढरपूरकडं प्रस्थान करतील. 5:15 वाजता आषाढी यात्रा स्वच्छता दिंडीचा समारोप सोहळा होणार आहे.
29 जून रोजी मध्यरात्री 2:30 वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा होणार आहे. ती पहाटे 4 पर्यंत चालणार आहे. या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री सहकुटुंब हजर राहतील, असं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांचा असा दोन दिवसीय सोलापूर दौरा असणार आहे. या शासकीय पुजेच्या निमित्तानं मुख्यमंत्री विठ्ठलाला काय साकडं घालतात, याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री आज सायंकाळी येणार पंढरपुरात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुधवारी दुपारी अडीच वाजता मुंबई विमानतळावरून विमानाने सोलापूरकडे प्रस्थान करतील. तेथून हेलिकॉप्टरने पंढरपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ४.३० वाजता शासकीय पंढरपूर शासकीय
विश्रामगृहात ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित समारोप होईल. सायंकाळी पाच वाजता याच ठिकाणी वनविभागाच्या कॉफी टेबल बुकचे शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन होईल. सायंकाळी सव्वापाच वाजता पंचायत समितीत आषाढी यात्रा स्वच्छता दिंडीचा समारोप होईल. तेथेच त्यांचा मुक्काम असेल.
गुरुवारी पहाटे २.१० वाजता महापूजेसाठी ते मंदिराकडे निघतील. पहाटे ४.३० पर्यंत महापूजा होईल.
सकाळी सव्वादहा वाजता विश्रामगृहात अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तिपत्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप होणार असून, सकाळी ११ वाजता तीन रस्ता येथे त्यांच्या हस्ते अन्नदान होईल. सकाळी साडेअकरा वाजता तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिरास ते उपस्थित राहतील. दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कृषी प्रदर्शनात त्यांचे आगमन होणार आहे.
दुपारी १२.४० वाजता हेलिकॉप्टरने त्यांचे सोलापूरकडे प्रयाण होणार असून, दुपारी १.१० वाजता ते सोलापूर विमानतळावरून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज