टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र शासनाने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिलेल्या सुविधा या कुचकामी ठरू लागल्या असून या सुविधांचा लाभ राज्यातील प्रत्येक अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मिळावा
यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून संबंधित विभागाला योग्य त्या सुचना देवून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना न्याय दयावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडे दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.
ना.शिंदे हे ठाणे येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांना भेटून सदरचे निवेदन त्यांचेकडे सुपुर्त करण्यात आले.
दरम्यान,मुख्यमंत्री ना.शिंदे यांनी सदर निवेदन स्विकारून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालून त्या सोडविणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचनालय कार्यालयाकडे राज्यातील अनेक अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना स्मार्ट कार्डचे वितरण केले आहे.
परंतू हे स्मार्ट कार्ड कुचकामी ठरू लागल्याची तक्रार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांना टोळमाफीबाबत घोषणा करूनही टोळ नाक्यावर जाणुन बुजून पत्रकारांची अडवणूक केली जाते.
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही ताटकळत ठेवले जाते. शासकिय विश्रामगृहात गेल्यानंतर अनेक कारणे सांगितली जातात. विशेषतः विश्रामगृह बुकींग आहे असे तोंडी सांगून परत पाठविले जाते.
म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेचा लाभ ग्रामीण भागातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मिळविण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागते.
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी किमान 30 वर्षे पत्रकारितेतील अनुभवाची अट असून ती कमी करून 25 वर्षे करावी आदी मागण्या या निवेदनाव्दारे करण्यात आल्या.
यावेळी खा.श्रीकांत शिंदे,माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे,वतात्यासाहेब चव्हाण, दत्तात्रय घाडगे, विजय ठेंगील, समाधान वाघमारे, गणेश कांबळे, संतोष सकट आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज