mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपुरात; ‘या’ महत्त्वाच्या घोषणा करणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 23, 2025
in राजकारण, राज्य, सोलापूर
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात येत आहेत. यावेळी ते बहुचर्चित कॉरिडॉरबद्दल काही महत्त्वाच्या घोषणा करतीलच.

कारण, एकादशीनंतर लगेचच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक झाली. कॉरिडॉर मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे.

काशी आणि उज्जैन येथील कॉरिडॉरच्या धर्तीवर दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कॉरिडॉर (विकास आराखडा) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या कॉरिडॉरमध्ये काय काय असणार याची उत्सुकता राज्यात वाढत चालली आहे.

पंढरपुरात दररोज किमान लाखभर भाविक दर्शनासाठी येतात. आषाढी कार्तिकीसह प्रमुख चार यात्रांसाठी तर लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होते.

यंदाच्या आषाढी वारीत विक्रमी २० लाखाहून अधिक भाविक पंढरीत आल्याची नोंद झाली आहे. पंढरपूरच्या विठुरायाची महती जगभर पोचावी, देश विदेशातून पर्यटक आणि भाविक पंढरपूरला यावेत. पंढरपूरचा विकास धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून व्हावा.

त्यातून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने राज्य सरकारने विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हजारो कोटी रुपये खर्च करणार आहे.

यामुळे पंढरपुरच्या सौंदर्यात भर पडणार आहेच, शिवाय आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. कॉरिडॉरच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासासाठी नवी संधी मिळणार आहे.

पंढरपुरातील कॉरिडॉर हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. विकास आराखडा राबवताना स्थानिकांना विश्वासात घेऊन राबवला जाणार आहे. भूसंपादन आणि त्याचे परिणाम याचाही यामध्ये विचार केला जाणार आहे. भूसंपादन करताना मालमत्ताधारकांना विश्वासात घेऊनच पारदर्शकपणे ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. – संतोष देशमुख, कॉरिडॉर भूसंपादन अधिकारी, पंढरपूर

असा असेल काॅरिडाॅर

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी एक पाहणी केली. यात सुमारे ६३० मालमत्ताधारक बाधित होणार आहेत. बाधित लोकांना योग्यप्रकारे आर्थिक मोबदला देण्यासाठी एक पॅकेज देखील तयार केले आहे.

काहींनी आपला विरोध कायम असल्याचे सांगितले आहे तर काही स्थानिक लोकांनी मात्र आर्थिक मोबदला समाधानकारक मिळाला तर आम्ही जागा देऊ अशी तयारीही दर्शवली आहे. चर्चेनंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

सध्यातरी शासन कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉरिडॉर तयार करण्यावर ठाम आहे. तशी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्याच्या कार्यक्रमात कॉरिडॉरबाबत काय भाष्य करतात, याकडे पंढरपूरकरांसह राज्यातील भाविकांचे लक्ष लागले आहे.

हा कॉरिडॉर चौफळा ते महाद्वारपर्यंत तयार केला जाणार आहे. यामुळे मंदिर परिसरात जवळपास दोन्ही बाजूला तीनशे मीटर परिसर मोकळा राहणार आहे. मंदिर परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.(स्रोत:सकाळ)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर

संबंधित बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Shocking News! विद्यार्थ्याला शिक्षा करणं भोवलं; शिक्षकाला तब्बल १ लाख रुपये दंड आणि ६ महिने तुरुंगवास; नेमकं काय घडलं?

July 23, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

हट्ट नडला! डान्स क्लास लावण्याचा हट्ट, आई-वडिलांनी दिला नकार; मुलीनं संपवलं आयुष्य

July 23, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांना अटकपूर्व जामीन; कागदपत्रांचा व मुद्द्‌यांचा विचार करून न्यायालयाने काही अटीसह जामीन अर्ज मंजूर

July 23, 2025

मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात; ‘या गावातील धक्कादायक प्रकार

July 21, 2025
राष्ट्रहित आणि समाजाला दिशा देणारे उपक्रम सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर घेतलेले अत्यंत कौतुकास्पद; जीवनगौरव पुरस्कार वितरण आणि स्नेहसंवाद मेळावा दिमाखात संपन्न

राष्ट्रहित आणि समाजाला दिशा देणारे उपक्रम सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर घेतलेले अत्यंत कौतुकास्पद; जीवनगौरव पुरस्कार वितरण आणि स्नेहसंवाद मेळावा दिमाखात संपन्न

July 23, 2025
संतापजनक! 13 दिवसाचे बाळ वारंवार रडल्यानं मामाकडून पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

धक्कादायक! नातलग असलेल्या 3 बालकांना अचानक लुळेपणा अन् अशक्तपणा; आरोग्य यंत्रणा हादरली

July 21, 2025
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची होणार सुटका; ‘ही’ बँक देणार सोसायट्यांना कर्ज; असा झाला निर्णय

July 20, 2025
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी करणार आता युरोप, जर्मनी, फ्रान्स आणि चीनचा अभ्यास दौरा; ‘या’ तारखेपर्यंत कृषी कार्यालयाकडे अर्ज करण्याचे आवाहन

July 19, 2025
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! बसवेश्वर स्मारकासाठी मंगळवेढ्यातील ‘ही’ जागा निश्चित करावी; पालकमंत्री जयकुमार गोरे

July 19, 2025

ताज्या बातम्या

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपुरात; ‘या’ महत्त्वाच्या घोषणा करणार?

July 23, 2025
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Shocking News! विद्यार्थ्याला शिक्षा करणं भोवलं; शिक्षकाला तब्बल १ लाख रुपये दंड आणि ६ महिने तुरुंगवास; नेमकं काय घडलं?

July 23, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

हट्ट नडला! डान्स क्लास लावण्याचा हट्ट, आई-वडिलांनी दिला नकार; मुलीनं संपवलं आयुष्य

July 23, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांना अटकपूर्व जामीन; कागदपत्रांचा व मुद्द्‌यांचा विचार करून न्यायालयाने काही अटीसह जामीन अर्ज मंजूर

July 23, 2025
प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

प्रेयसी समवेत एकत्र राहण्यासाठी प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव फसला; कोर्टाने पुन्हा सुनावली कोठडी; पोलिसांनी ‘या’ कारणास्तव वाढीव पोलिस कोठडी केली मागणी

July 22, 2025

मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात; ‘या गावातील धक्कादायक प्रकार

July 21, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा